* जनतेच्या करातून आलेल्या सत्ताधाऱ्यांचे कपडे आता जनताच फाडेल : राहुल भाऊ बोंद्रे
चिखली : (एशिया मंच न्युज)
लोकांच्या आंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे, लाडक्या बहिणींना पगार सरकार देते , अशा प्रकारचे विधान करुन भाजपाचे माजी मंत्री तथा माजी आमदार बबनराव लोणीकर राज्यातील शेतकरी व लाडक्या बहिणींचा अपमान केला. मात्र सत्ताधाऱ्यांच्या अंगावरील कपडे, बूट, आमदारकी, गाडीतील डिझेल, विमानाचे तिकीट, नेतेगिरी ही जनतेमुळेच आहे. कारण जनतेने भरलेल्या करातूनच सरकार चालते. जनतेच्या करातून आलेल्या सत्ताधाऱ्यांचे कपडे आता जनताच फाडेल. तसेच यापुढेही भाजपच्या नेत्यांची अशाच प्रकारची बेताल वक्तव्ये सुरु राहिली तर जनता यांना खरोखर जोडे मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भाऊ यांनी केले.
सोमवार ३० जून रोजी चिखली येथे तालुका काँग्रेसच्या वतीने भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तद्नंतर चिखली तहसिलदार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. लोणीकर यांच्या अत्याचारी व अपमानकारक वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दयावी, त्यांची आमदारकी तात्काळ रदद् करण्यात यावी, भविष्यात कोणीही लोकप्रतिनिधी सामान्य जनतेविषयी अपमानास्पद भाषा वापरणार नाही, यासाठी कठोर कायदा करावा. अन्यथा चिखली काँग्रेसच्या वतीने यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डाॅ. मोहमंद इसरार, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, प्रा.राजु गवई , प्रा. निलेश गांवडे , युवक काँग्रेसचे विकास लहाने, रिक्की काकडे, डाॅ. सत्येंद्र भुसारी, ज्ञानेष्वर सुरूशे , किशोर कदम, शहेजादअली खान, पांडुरंग पाटील भुतेकर, जय बोंद्रे, सेवालदचे रामेष्वर भुसारी, विजु पाटील शेजोळ, ईष्वरराव इंगळे, शिवराज पाटील, डाॅ. अमोल लहाने, सरपंच मनोज लाहुडकर, डाॅ. संजय घुगे, मनोज जाधव, सतिष षिंदे, अमिनसेठ, सचिन शेटे, शिवनारायण म्हस्के, राजु रज्जाक, दिपक थोरात, विलास कंटुले, बंडु कुळकर्णी, बिदुसिंग इंगळे, रोहन पाटील, रमजान चैधरी, खलील बागवान, विजय जागृत, प्रकाष सपकाळ, आरिफ बागवान, भास्कर चांदोरे, मोहित घुगे, शेषराव आंभोरे, अशोक झगरे, दत्तात्रय करवंदे, जिवनबापु देशमुख, समाधान आकाळ, पवन सपकाळ, दिलीप पाटील, रोहन करंडे, शेख मजिद, शेख अजिम, अच्युतराव पाटील, मनोहर म्हळसने, व्यंकटेश रिंढे, जाकीर शेख, सदुनाना ठेंग, दिलीप चवरे, शिवा म्हस्के, प्रकाश राठोड, तात्या करंडे, शकीलभाई, शेख अजिम, विठ्ठल शेळके, अब्दुल अजिस, राहुल हिवाळे, राहुल चैथे, विजय येवले, प्रकाश कुटे, मोतीराम शेजोळ, उमाकांत सेठ, प्रसाद डुकरे, सागर वायाळ, विजय सोनवाल, प्रविण वानखेडे, दयाळु राठोड, उकर्डा राठोड, इलियास शेख, विकी पवार, मुकींदा खरात, चेतन गायकवाड, सागर वांजोळ, विजु पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
* हा तर शेतकरी आणि लोकशाही मूल्यांचा अपमान : राहुल भाऊ बोंद्रे
राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, राज्यातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेचा पाया आहे. परंतु भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी अत्यंत अवमानकारक व असंवेधनशिल वक्तव्य करून संपूर्ण शेतकऱ्यांचा आणि लोकशाही मुल्यांचा अपमान केला आहे. तसेच आपल्या लाडक्या बहिणींविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अशोभणीय भाषा वापरली आहे. शेतकरी व लाडक्या बहिणींचा अपमान सहन केल्या जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.