श्रींच्या नगरीचा सर्वांगीण विकास करणाऱ्या मुख्याधिकारी मोकळ यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

श्रींच्या नगरीचा सर्वांगीण विकास करणाऱ्या मुख्याधिकारी मोकळ यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्युज)
        शहरातील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार अरुण मोकळ यांनी 9 जुलै 2021 रोजी स्वीकारल्यानंतर शहराचा सखोल अभ्यास करून शहराच्या सर्वांगीण विकास कसा करता येईल याचे नियोजन केले. ज्या-ज्या वेळी जी-जी विकासाचे कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्या-त्या त्यावेळी संबंधित लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा शहराच्या विकासाकरता निधी कमी पडू नये म्हणून शासन स्तरावर आपापले वजन वापरून निधी प्राप्त करून घेतला.            शहरातील विविध प्रभागात विकास होत असताना विकासाचा समतोल राखण्यात आल्याने अल्पावधीतच मुख्याधिकारी अरून मोकळ हे शहरासाठी "सिंघंम"म्हणून ओळखल्या जाऊ लागले. नगर परीषदच्या इतिहासात कधीच न निघालेले अतिक्रमण हे त्यांनी अल्पकाळात दूर करून शहराचा कोंडलेला श्वास मोकळा केला. शहराची इतरत्र आगळी वेगळी ओळख व्हावी यासाठी शहर सौंदर्याचा लोकसभागातून झपाटा लावला. शहरातील सर्वच मुख्य चौकाचे सुशोभीकरण करून कुंभारी फाटा ते वीरा हॉटेलपर्यंत पाच किलोमीटर पर्यंतचा अंतर्गत सिमेंटचा चौपदरी रस्ता तयार करून त्यावर सोलारवर चालणारे पथदिवे बसवण्यात आले. शहराचा होत असलेला सर्वांगीण विकास पाहता, शिवसेना पक्षाचे वतीने (शिंदे गट) अरुण मोकळ यांचा छोटेखानी त्यांच्याच कार्यालयात सत्कार करण्यात आला.
      यावेळी शिवसेना शहरप्रमुख गोपाळ व्यास, माजी नगरसेवक विजय देव उपाध्ये, सलीम खान पठाण, राजू सपाटे, मोरेश्वर मीनासे, बंटी सुनगत,
 नंदन खेडेकर, अजय दिडहाते, संदीप शिंदे, राजू कांबळे, शेख जावेद, शेख अनिस यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.