'स्वाभिमान देण्याची ताकद शिव, फुले, शाहु, आंबेडकर विचारधारेत' : ज्ञानेश महाराव
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
बहुजन समाजामध्ये जन्माला आलेल्या महापुरूषांनी आपल्या कृतीतून आपले महात्म सिंध्द केले. सर्वसामान्य माणसांमध्ये स्वाभिमान पेरण्याची ताकद शिव, फुले, शाहु, आंबेडकर विचारधारेतच असल्याचे ठाम प्रतिपादन संपादक, विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व विश्चरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त उत्सव समितीच्यावतीने स्थानिक गांधी भवनच्या प्रांगणावर आयोजित व्याख्यानात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शोण चिंचोले, शाहीर डि.आर.इंगळे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त गजानन घिरके यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू व साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या भेटीतील किस्सा सांगताना, त्यांनी अण्णाभाऊंनी पंडीत नेहरू यांना मला भेटायचे असेल तर त्यांनी माझ्या झोपडीत यावे अशी बाणेदार भूमिका घेऊन आपल्या स्वाभिमानी वृत्तीचा परिचय दिल्याचे सांगितले. तर महात्मा फुले हे आपल्या कृतीतून .'महात्मा' उपाधी मिळण्यापूर्वीच महात्मा झाले होते. या संदर्भातील एक प्रसंग सांगितला. तर महात्मा गांधी हे महात्मा ज्योतीबा फुले यांना महात्म्याचे महात्मा म्हणायचे त्यामुळे महात्मा फुलेंची उंची किती होती, याचा प्रत्यय येतो असेही ते म्हणाले. आपल्या महापुरूषांनी एक विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ते गाठले. त्यामुळे आपणही समाज हिताचे ध्येय ठरवून ते गाठण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येकाने सत्यासाठी 'सत्ते' विरोधात लढण्याची तयारी ठेवली पाहिजे तरच आपण आपल्या महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करणे व त्यांचा जय जय कार करण्याच्या पात्रतेचे होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
* ..तर व्हिव्हिपॅटच्या चिठ्ठया मोजून दाखवा :
ईव्हिएममध्ये गडबड करून महायुतीचे सरकार आणले गेल्याचा आरोप करून आणले गेले आहे. लाडकी बहिण योजनेशी याचा संबंध नाही. जर हे खोटं असेलतर व्हिव्हिपॅटच्या चिठ्ठया मोजून दाखवा, असे खुले आव्हान महाराव यांनी व्याख्याना दरम्यान केले.
यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025 चे पदधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रास्ताविक कुणाल पैठणकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक खंडेराव सर यांनी मानले.