देऊळगाव राजा : (एशिया मंच न्युज)
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना व जनसेवा सामाजिक संघटना देऊळगाव राजा च्या वतीने विरंगुळा भवन या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज 11 एप्रिल रोजी साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या प्रसंगी गोविंदराव अहिरे, मापारी मामा, अरुण सपाटे , रमेश नरोडे , प्रा. अशोक डोईफोडे , गोविंद बोरकर संजय वालेकर व प्रकाश अहिरे उपस्थित होते. याप्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावरउपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला .