आपले संघटन क्रमांक एकवरच राहिले पाहिजे - उपनेते नितिनबापु देशमुख* मेहकर येथे शिवसेनेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न

आपले संघटन क्रमांक एकवरच राहिले पाहिजे - उपनेते नितिनबापु देशमुख
* मेहकर येथे शिवसेनेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न
मेहकर : (एशिया मंच न्युज)
       शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बुलढाणा जिल्हा (घाटावरील पदाधिकारी) यांची विभागीयस्तरीय संघटनात्मक आढावा बैठक तसेच उपनेते व आमदार नितिनबापु देशमुख (बाळापूर), आमदार सिद्धार्थ खरात यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आज ५ फेब्रुवारी रोजी स्थानिक हॉटेल प्राईड येथे पार पडला.

        शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी विभागीय संघटनात्मक आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शिवसेनेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार बुथ प्रमुख सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. संघटना मजबुतीसाठी त्याचे योगदान मोठे असते. तेव्हा वरिष्ठ पदाधिकारी यांनी बुथ प्रमुखापर्यत लक्ष देऊन संघटना मजबुती करिता मेहनत घ्यावी, बुथ प्रमुखांच्या संपर्कात रहावे. त्यांच्या अडी-अडचणी सोडवाव्यात यामुळे संघटना वाढीस चालना मिळते, असे त्यांनी प्रामुख्याने आपले विचार मांडले. सोबतच बुलढाणा जिल्ह्यात आपले संघटन क्रमांक एकवरच राहिले पाहिजे, असेही त्यांनी आढावा बैठकीत बोलतांना व्यक्त केले.

        यावेळी जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, सह संपर्क प्रमुख छगन दादा मेहेत्रे, उपजिल्हा प्रमुख, आशिष रहाटे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजयाताई खडसान, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हा संघटक गोपाल बछिरे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, शहर प्रमुख किशोर गारोळे, युवा सेना तालुका अधिकारी आकाश घोडे, महेंद्र पाटील, अॅड. दिपक मापारी, लखन गाडेकर, किसनदादा धोंडगे, विधानसभा संघटक किसन पाटिल, माजी जि.प. सदस्य दिलीप वाघ, किसान सेना उपजिल्हा प्रमुख नारायण बळी, जिजाताई राठोड, तारामती जाधव, स्वाती नवले, संजीवनी वाघ, आरती देशमुख, माजी नगराध्यक्ष, अशोक अडेलकर, संदीप गारोळे, अॅड. संदीप गवई, भागवत बोरकर, युवा सेना शहर अधिकारी जगताप, नगमा गवळी, माजी जि.प. सदस्य संजय वडतकर, वसंतराव आलटे, माजी सभापती सतिश ताजने व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

      प्रास्ताविक व संचालन उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे यांनी केले. यावेळी संदीपदादा शेळके, युवा सेना जिल्हा अधिकारी नंदन क-हाडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजया पाटील खडसान, सह संपर्क प्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, आमदार सिध्दार्थ खरात, संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची भाषणे झाली. आभार तालुका प्रमुख निंबाजी पांडव यांनी मानले. यावेळी माजी जि.प. सदस्य संजय वडतकर यांनी रा.कॉ. (शरद पवार) गटातून शिवसेनेत प्रवेश केला. उपनेते तथा आ. नितीन देशमुख, आ. सिध्दार्थ खरात, संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत सह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.