*भारताची माजी महिला कर्णधार मिताली राज यांच्याहस्ते डे नाईट मैदानाचे भूमीपूजन
माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या धर्मवीर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बुलढाणाचा राजे छत्रपती संघ विजेता ठरला असून या संघाला 7 लाख 77 हजार 77 रूपये चे प्रथम रोख बक्षिस व आमदार चषक आ.संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर उपविजेते पदाचे द्वितीय बक्षिस त्रिशा इलेव्हन या संघाला 3 लाख 33 हजार 33 रूपयांचे रोख बक्षिस शिवसेना युवानेते मृत्यूंजय गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. या दरम्यान भारताची माजी महिला कर्णधार मिताली राज हिच्याहस्ते जिजामाता क्रिडा व व्यापारी संकूलात डे नाईट मैदानाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, न.पा.मुख्याधिकारी गणेश पांडे, तहसिलदार विठ्ठल कुमरे, ठाणेदार नरेंद्र ठाकरे, या स्पर्धेचे संयोजक विजय दुरणे, पवन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आखाडा बुलढाणाच्या सौजन्याने भव्य धर्मवीर आमदार चषक 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे 9 फेब्रुवारी रोजी धर्मवीर आमदार चषक टेनिस क्रिकेट अंतिम सामन्यासाठी भारताच्या माजी महिला कर्णधार मिताली राज यांची प्रमुख उपस्थिती होती.
धर्मवीर आमदार चषक स्पर्धेचा अंतिम सामना राजे छत्रपती संघा विरूद्ध त्रिशा इलेव्हन यांच्यामध्ये झाला. राजे छत्रपती संघाने नानेफेक जिंकूण प्रथम क्षेत्ररक्षण घेतले व फलंदाजीसाठी त्रिशा संघाला आमंत्रित केले. सलामीला फलंदाजी करीत त्रिशा संघाच्या फलंदाजानी 12 षटकांमध्ये 103 धावांची खेळी करीत 9 खेळाडू गमावले. त्याबदल्यात राजे छत्रपती संघाने उत्कृष्ठ फलंदाजीचे प्रदर्शन करीत 11 व्या षटकात 103 धावा वर मात करीत 7 गडी गमावत या स्पर्धेत 4 गडी राखून विजय संपादन केला. या सामन्यात उत्कृष्ठ फलंदाज म्हणून ओमी कीणी (मुंबई), उत्कृष्ठ गोलंदाज हिमाशू पाटील (मुंबई), स्पर्धेचा उत्कृष्ठ खेळाडू म्हणून हिमांशू पाटील याचा विशेेष पारितोषिक देऊन आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते सन्माचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सामन्याचे समालोचन सुप्रसिद्ध अँकर रेश्मा मयेकर, आर. जे. ओम, अनिकेत ब्राम्हंदे, श्याम सोनुने यांनी केले. यांचाही सन्मान आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आला. हा चषक यशस्वी करण्यासाठी श्रीकांत गायकवाड, नितीन राजपूत, जिवन उंबरहंडे, निलेश पाटील, विजय काळवाघे, दिपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, नयन शर्मा यांनी परीश्रम घेतले.
* विदर्भातील खेळाडूंना जागतिक स्तरावर संधी देण्यास आ. गायकवाड प्रयत्नशील : मिताली राज
बुलढाण्यात आल्यावर आ. संजय गायकवाड यांनी या मातीत अनेक खेळाडू घडविले ते स्वतः एक चांगले क्रिडापटू असल्याने त्यांचे खेळावर अतिशय प्रेम आहे. हे मला कळले. बुलढाणा शहरात ऑल्मपीक दर्जाची मैदाने निर्माण करण्याचा त्यांचा माणस आहे. त्याचा एक भाग म्हणून आज या जिजामाता क्रिडा संकूलावर डे नाईट सामन्याचे अद्यावत मैदानाचे माझ्या हस्ते भूमीपूजन होत आहे. खेळासाठी मेहनत घेणारे आ. संजय गायकवाड यांचा मला अभिमान असल्याचे यावेळी भारतीय महिला संघाचे माजी कर्णधार मिताली राज यांनी सांगितले.
* जागतिक स्तरावरच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेणार : आ. गायकवाड
जागतिक स्तरावरील क्रिडा स्पर्धा सुविधा अभावी पूणे, मुंबई यासारख्या शहरात आयोजित केल्या जातात यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळत नाही, याचे शल्य आपल्या मनात अनेक वर्षांपासून असून आपण येणार्या काळात बुलढाणा शहरातील जिजामाता क्रिडा संकूल व शिवाजी महाविद्यालय समोरील प्रागंणामध्ये ऑल्म्पीक दर्जाचे क्रिकेट, स्विमिंग, कुस्ती, हॉलीबॉल, फुटबॉल अशा विविध खेळांचे मैदाने विकसित करत आहोत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या मैदानाचे काम पूर्ण करून बुलढाणा शहरात जागतिक स्तरावरील क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असेही आ. संजय गायकवाड यांनी याप्रसंगी सांगितले.