राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाझेरजी काझी यांच्यावर केलेले आरोप नितांत खोटे : युवा जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाझेरजी काझी यांच्यावर केलेले आरोप नितांत खोटे : युवा जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर 
बुलडाणा : (एशिया मंच न्युज)
        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या नाझेरजी काझी यांच्या नेतृत्वावर काही व्यक्तींनी केलेले आक्षेप हे पक्षविरोधी कारवायांपासून स्वतःला वाचवण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न आहे.

      गेल्या १४ वर्षांपासून पक्षाच्या कार्यात निस्वार्थपणे योगदान देत असताना असा अनुभव कधीच आला नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षविरोधी कृती करणाऱ्या काही मंडळींनी वाढत्या पक्षबळाला अडथळा आणण्याच्या उद्देशाने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

       गेल्या विधानसभेपासून माजी जिल्हाध्यक्षा यांनी पक्षाविरोधात काम केल्याची माहिती अनेक कार्यकर्त्यांच्या कानावर होती. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणार, अशी चर्चा सुरू होती. ही कारवाई टाळण्यासाठीच राजीनामा आणि नेतृत्वावर आक्षेप घेण्याचे नाट्य उभे केले जात आहे.

         राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षात ४ वर्षे कार्यरत राहिलेल्या व्यक्तींनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पक्षाचे तब्बल चार दशके निष्ठेने नेतृत्व करणाऱ्या नाझेर काझी यांच्यावर प्रश्न उपस्थित करणे अत्यंत दुर्दैवी आहे. पक्षाच्या भविष्यासाठी अशा विरोधी प्रवृत्तींना हद्दपार करणे आवश्यक आहे, असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी बुलडाणा जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर यांनी केली आहे.