संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने बौद्ध वधू-वर परिचय मेळावा* मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद

संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने बौद्ध वधू-वर परिचय मेळावा
* मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        गेल्या पाच वर्षांपासून संवेदना प्रतिष्ठानच्या  वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यात बौद्ध वधू-वर परिचय मेळावे घेण्यात आले आहेत. या परिचय मेळाव्यातून असंख्य वधू-वर यांचे विवाह सुद्धा पार पडले असून यावर्षी सुद्धा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने बुलढण्यातील सामाजिक न्याय भवन येथे बौद्ध समाजातील वधू- वर परिचय मेळावा घेण्यात आला.

       या मेळाव्याचे अध्यक्ष पत्रकार संजय जाधव हे होते तर उदघाटक रजनीताई क्षीरसागर, सौ. लता जाधव, सौ. तेजकला कंकाळ , सविता मोरे, सुशीला आराख ह्या होत्या. या मेळाव्याला राज्यभरातून असंख्य वधू-वर व त्यांचे पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी वधू-वर यांनी आप-आपला  सविस्तर परिचय दिला.  काहींनी तर याचं मेळाव्यात आप -आपला जोडीदार पसंत करून पुढील कार्य सुद्धा पाडण्यास सुरुवात केली, असल्याचे दिसून आले.

       आजच्या या स्पर्धेच्या युगात मुला- मुलींचे वय वाढत चालले आहे, त्यामुळे त्यांचे विवाह सोहळे वेळेवर व्हावेत याच उद्देशाने हा बौद्ध समाजातील वधू-वर परिचय मेळावा घेण्यात येत असल्याचे आयोजक यांनी सांगितले.

      उदघाटणीय प्रसंगी रजनीताई क्षीरसागर , तेजकला कंकाळ, मोरेताई यांनी मनोगत व्यक्त केले. तर असे वधू-वर परिचय मेळावे का घेण्यात येत आहे, पूर्वी का घेतले जात नव्हते. आजची परिस्थिती का बदलली. यावर सविस्तर प्रकाश कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय जाधव यांनी टाकला. प्रास्ताविक नंदकिशोर खोडके यांनी केले. या मेळाव्याचे संचालन मनोहर मोरे यांनी केले तर मेळाव्याचे  यशस्वीतेसाठी संवेदना प्रतिष्ठानचे सदस्य लक्ष्मण कंकाळ, चंद्रकांत आराख, प्रभाकर गवई , कैलास मोरे, राजाराम गवई , प्रकाश जाधव, कुमार क्षीरसागर, वसंत सरदार, प्रशांत इंगळे, विलास बनसोड, भीमराव इंगळे, मानिकराव गवई , यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.