17 लाखाच्या गुटख्यासह वाहन जप्त * अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

17 लाखाच्या गुटख्यासह वाहन जप्त * अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई 
जळगाव जामोद : (एशिया मंच वृत्त)
       मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून देऊळगावराजा येथे बोलेरो पिकअप वाहनातून नेण्यात येणारा १७ लाख ३३ हजार ७५० रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने  बऱ्हाणपूर मार्गावर असलेल्या तालुक्यातील रसलपूर फाट्याजवळ रविवारी ७ जानेवारी २०२४ रोजी ही कारवाई करण्यात आली.
       याबाबत मिळालेली माहिती अशी की,  गुटख्याच्या वाहतुकीबाबत अमरावती येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने  रविवारी ७ जानेवारी २०२४ रोजी  सकाळी ६.५० च्या सुमारास बऱ्हाणपूर मार्गावरील रसलपूर फाट्याजवळ सापळा रचून  या दरम्यान बऱ्हाणपूरहून येणारे बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक : एमएच २८ - बीबी ६८८७) थांबवून तपासणी  घेण्यात आली असता वाहनातून १७ लाख ३३ हजार ७५० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच ८ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. हा गुटखा देऊळगावराजा येथे नेला जात असल्याचे चौकशीत समोर आले. गुटखा वाहतूक करणारा आरोपी परमेश्वर निर्मळे (रा. देऊळगावराजा) याला सह गुटख्याची वाहतूक वाहन जळगाव जामोद पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले.  
    पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नारायण सरकटे करत आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त दक्षता आयुक्त समाधान पवार, सहाय्यक आयुक्त आनंद महाजन, सह आयुक्त जयपूरकर, सहाय्यक आयुक्त केदारे, अन्नसुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी, गुलाबसिंग वसावे, रवींद्र सोळंके, देशमुख, पोलिस हेड कॉस्टेबल उमेश शेगोकार, पोलिस नाईक शेख इरफान, पोलिस कॉस्टेबल सचिन राजपूत, पोलिस कॉस्टेबल पहाड, पोलिस कॉस्टेबल रणजीत व्यवहारे यांनी केली.