सुखदेव सिंह गोगामेडी यांना भारतरत्न द्या - संदीपदादा शेळके
* वन बुलढाणा मिशनच्या कार्यालयात स्व. गोगामेडी यांना अभिवादन
सुखदेव सिंह गोगामेडी यांचा समाजावर प्रभाव होता. सामाजिक एकजुटीसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा, अशी मागणी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांनी केली.
वन बुलढाणा मिशनच्या जिल्हा संपर्क कार्यालयात 7 डिसेंबर रोजी स्व. सुखदेवसिंहजी गोगामेडी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संदीपदादा शेळके बोलत होते. राजस्थानची राजधानी जयपूर येथे 5 डिसेंबर 2023 रोजी तीन हल्लेखोरांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या केली. राजस्थानसह संपूर्ण देशभर या घटनेचे पडसाद उमटले.
वन बुलढाणा मिशनच्या कार्यालयात स्व.गोगामेडी यांना अभिवादन करण्यात आले. गोपालसिंग राजपूत, पृथ्वीराज राजपूत, प्रतीक गायकवाड यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी प्रणय राजपुत, किरण राजपूत, रवींद्र राजपूत, सुरज बुधवत, गोविंद येवले, सागर इंगळे, राजू सुरडकर, विठ्ठल देशमुख यांच्यासह वन बुलढाणा मिशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.