पेनटाकळी प्रकल्पातील जलसमाधी आंदोलनाला यश * अखेर कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी व्यवस्थापन यांनी लेखी देत मागण्या केल्या मान्य * कालव्याची दुरुस्ती व कालवा फुटुन झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळणार

पेनटाकळी प्रकल्पातील जलसमाधी आंदोलनाला यश 
* अखेर कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी व्यवस्थापन यांनी लेखी देत मागण्या केल्या मान्य 
* कालव्याची दुरुस्ती  व कालवा फुटुन झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळणार
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
       काल पेनटाकळी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई तसेच आर.सी.सी. ट्रफ चा नवीन कॅनॉल बांधकाम करून उर्वरित गावाना पाणी सोडणे व गेल्या दोन वर्षांपासून रायपुर, सावञा, सोनारगव्हान, मोसेंबेवाडी, मिस्किनवाडी, मारोतीपेठ, जानेफळ, निम्बा, लोणीकाळे, गोमेधर, उटी, घाटनांद्रा, वरवंड, बोथा, बार्डा येथिल शेतकऱ्यांना पाणी न सोडल्यामुळे त्याची ४ हजार ४४८ हेक्टरची नुकसान भरपाई देणे तसेच सदर कालवा फुटुन पेनटाकळी, ब्रह्मपुरी, रायपूर, पाचला, रायपुर या गावच्या शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची नुकसान शेतकऱ्यांना अदा करावी या मागण्यासाठी काल पेनटाकळी प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. संबंधित  विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, ही  बाब रविकांत  तुपकर  यांच्या निदर्शनास आणुन दिली. त्यांनंतर त्यांनी जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठाशी तातडीने दुरध्वनीवरुन संपर्क करत माहीती दिली व तात्काळ दखल घेण्यास सांगितले. अन्यथा याची जबाबदारी तुमची राहील, अशी भुमिका घेताच संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता चोपडे,  उपविभागीय अधिकारी व्यवस्थापन नवले हे  आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांचेबाबत जे.ई.शिंदे यांनी चर्चा करत सर्व मागण्या मान्य करत लेखी दिले. त्यानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले.