* शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्ह्यात होणारे बाल लैंगिक अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून त्यावर उचित कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. अशाच एक प्रकार पातुर्डा जवळील कोद्री या गावातील चिमुकलीवर अत्याचार करणारा अजूनही त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली असल्याने तो मोकाट फिरत असून पोलिसांनी त्याला जेरबंद करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, भारत सरकार महिला बालविकास मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशन, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्ह्यात १४ सप्टेंबर २०१२ पासून चाइल्ड लाइन १०९८ हा प्रकल्प भारतीय बहुउद्देशीय लोक शिक्षण संस्था, बुलडाणा अंतर्गत राबवला जात होता. त्यामध्ये संस्थेअंतर्गत बुलडाणा चाइल्ड लाइन प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या ११ वर्षांत काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या विविध बालकांच्या समस्यांवर काम करुन अनेक बालकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यानुषंगाने आज रोजी बुलडाणा जिल्ह्यात वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या बाल लैंगिक छळाचे प्रकार हे मन हादरून टाकणारे आहे. सदर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज नसल्याचे दिसून येत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा जवळ कोन्द्री
या गावात एक ८ वर्षीय चिमुकलीचा शाळेतील
५४ वर्षीय शिक्षकाकडून विनयभंग झाल्याची
घटना समोर आली आहे. बालिकेचा विनयभंग
होऊन २० दिवस झाले असताना सुद्धा सबंधित
पोलिस स्टेशनकडून आरोपीला अटक करून
शिक्षा देण्याची कुठलीही कार्यवाही न झाल्याचे
दिसून येत आहे. त्यामुळे बालिकेला न्याय
मिळवून द्यावा, अशा घटनांना प्रतिबंध घालणे
आवश्यक झाले आहे. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करून बाल लैंगिक अत्याचारावर थांबवावेत.
चिमुकलीच्या विनयभंगाच्या घटनेची चौकशी
करून, घटनेचा घटना अहवाल मागवावा
बालिकेला बाल कल्याण समिती, बुलडाणा
यांच्या समक्ष हजर करून आरोपीला अटक करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जिजा राठोड, पद्मा परदेशी, वैशाली कोलते यांनी केली आहे.
