मेहकर : (एशिया मंच वृत्त)
.सामाजिक जाणभाण व पत्रकारीतेतील भरीव योगदानाबद्दल , सकस लेखणीचे धनी ,पत्रकार कैलास हरिभाऊ राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. मातोश्री वत्सलाबाई बहुउद्देशीय संस्था साखरखेर्डा, महाराष्ट्र सारथी व दर्पण चौफेरच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते, संपादक कैलास राऊत सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव मानले जाते. गेल्या 18 वर्षांपासून त्याची पत्र सेवा सुरु आहे. मेहकर तालुख्यासह जिल्ह्याच्या प्रश्नावर ते सातत्यपूर्ण लिखाण करीत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा देऊन साखरखेर्डा येथे 30 डिसेंबर 2023 रोजी सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
*तरुणाई ने दिली ओळख :
तरुणाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम कैलास राऊत यांनी राबविले आहे. गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन अनेकांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे. ते विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असून त्यांनी केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र व राज्या बाहेरील 90 पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित केले आहे . बुलढाणा जिल्ह्यातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत देखण्या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे.
