केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      केंद्रीय कामगार, रोजगार आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हे उद्या शनिवार १६ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्हा दौ-यावर येत आहेत.
     केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीचा प्रचार व प्रसिद्धी करणा-या 'विकसित भारत संकल्प यात्रे'ला ते चिखली तालुक्यातील पेठ, जुनागाव आणि चिखलीतील आदर्श विद्यालयाला भेटी देतील.
     केंद्रीय मंत्री यादव हे छत्रपती संभाजीनगर येथून चिखली तालुक्यातील पेठ येथे दुपारी १ वाजता आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १ वाजता जुनागाव येथे आगमन व त्यांची वेळ राखीव राहील. दुपारी ३:४५ वाजता आदर्श विद्यालय येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रे'च्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सायंकाळी ५:३० वाजता मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील.