शेतजमीनीच्या हिस्सेवाटीचे प्रकरणी तलाठी किशोर कऱ्हाळे 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक * लाच लुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई

शेतजमीनीच्या हिस्सेवाटीचे प्रकरणी तलाठी किशोर कऱ्हाळे  30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक 
* लाच लुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
    शेतजमीनीच्या हिस्सेवाटीचे प्रकरणात किशोर कऱ्हाळे  यांनी 30 हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक, अमरावती पोलीस उपअधीक्षक यांनी सापळा रचून 1 डिसेंबर 2023 रोजी कारवाई केल्याची घटना साझा कार्यालय मोताळा येथे घडली आहे.
        सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार रा.रोहिणखेड  ता. मोताळा यांचे शेतजमीनीच्या हिस्सेवाटीचे प्रकरण तलाठी यांचेकडे दाखल होते. तक्रारदार यांनी तहसील कार्यालय मोताळा जि. बुलढाणा येथे रितसर अर्ज केला होता. तलाठी कऱ्हाळे यांनी तक्रारदारास हिस्सेवाटीचे प्रकरण मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती कऱ्हाळे यांनी 30 हजार रुपयाची  लाच पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. 1 डिसेंबर रोजी पो.नि. प्रवीण बोरकुटे ला.प्र.विभाग, अमरावती यांनी सापळा रचून  लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.
   सदर कारवाई  मारुती जगताप पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, देवीदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती, मिलिंदकुमार बहाकार पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रवीण बोरकुटे ला. प्र.वि अमरावती, युवराज राठोड, विनोदकुमार धुळे, स्वप्निल क्षिरसागर , राहुल वंजारी यांनी केली आहे. पो.स्टे.बोराखेडी ता. मोताळा जि. बुलढाना येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.