महाराष्ट्रातील सफाई कर्मचारी यांचा सिव्हील ६५० वरुन ५५०% पर्यंत करा : शेख जहीर शेख खालीद * सफाई कर्मचाऱ्यांना कर्ज मिळण्यास दिलासा मिळेल

 महाराष्ट्रातील  सफाई कर्मचारी यांचा सिव्हील ६५० वरुन ५५०% पर्यंत करा : शेख जहीर शेख खालीद 
* सफाई कर्मचाऱ्यांना कर्ज मिळण्यास दिलासा मिळेल
 बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
         महाराष्ट्रातील सफाई कर्मचारी यांचा सिव्हील ६५० वरुन ५५०% पर्यंत करण्यात यावे अशी मागणी शेख जहीर शेख खालीद यांनी १६ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली आहे.
      दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र सफाई कर्मचारी हे सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय येथे काम करणाऱ्या सफाई कामगारांना  दवाखाण्यातील दुःखद प्रकार,   अपघात तसेच केंद्र सरकारने केलेला निर्णय बँकेचा सिव्हील चांगला पाहीजे तरच बँक  कर्ज देवु शकते. तरी  महाराष्ट्र सरकारने सफाई कर्मचारी यांच्या  परिवाराचा विचार करुन त्वरीत महाराष्ट्र शासनाने सफाई कर्मचाऱ्यांचा बँकेचा सिव्हील ५५० % करावा जेणेकरून त्यांना कर्ज मिळण्यासाठी अडचण होणार नाही, दुसरीकडे केंद्र सरकारने  सफाई कर्मचाऱ्यांसाठी ६५० सिव्हिल स्कोर ठेवून दिला आहे, तो असेल तरच त्यांना  कर्ज मिळते, अन्यथा नाही यामुळे कर्मचाऱ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, या विषयावर राज्य सरकारने सफाई कर्मचाऱ्यांचा विचार करुन त्यांचा बँकेचा सिव्हील ५५०% पर्यंत करण्यात यावा.
       सफाई कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता, अस्वच्छ असलेले जागेची साफसफाई, घान नालीची  सफाई, नेमून दिलेले सार्वजनिक ठिकाणी साफसफाई चे काम करतात, असे काम करूनही त्यांना कर्ज मिळण्यासाठी जो सिव्हील  स्कोर दिलेला आहे त्यावर त्वरित विचार करून त्यांना दिलासा मिळावा, असे निवेदनात नमूद आहे.