गिट्टीखदानमध्ये गुदमरून मजुराचा मृत्यू* धोत्रा उजाड येथील घटना

गिट्टीखदानमध्ये गुदमरून मजुराचा मृत्यू
* धोत्रा उजाड येथील घटना 

खामगाव : (एशिया मंच वृत्त)
    गिट्टी खदानीत क्रशरखाली दबल्याने एका ३७ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची  घटना तालुक्यातील धोत्रा उजाड येथे आज 8 नोव्हेंबर २०२३ रोजी घडली. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
       सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की,  कमलसिंग रामचंद्रसिंग पटेरिया रा.पटवारा, जि.उज्जैन, मध्य प्रदेश हा  तालुक्यातील धोत्रा उजाड येथील एस.के. स्ट्रोन क्रशरमध्ये कामाला होता. तो मजूर आज  8 नोव्हेंबर रोजी काम करीत असताना अचानक क्रशरखाली दबल्याने गुदमरून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी अंदाजे ३ वाजेदम्यान घडली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तेथील  उपस्थित मजूर वर्गाने त्याला  मृतावस्थेत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात पाठविला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.