* फैज शाह द्वितीय, हर्षवर्धन वानखेडेने तृतीय क्रमांक पटकाविला
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी आझाद हिंद विद्यार्थी संघटना आणि श्रीजी इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने अंगणवाडी ते वर्ग पाच मधील विद्यार्थ्यांसाठी बाल चित्रकला स्पर्धा नुकतीच घेण्यात आली.
या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये प्रथम सुमैय्या शेख अजीम, द्वितीय फैज शाह इमरान शाह, तर तृतीय हर्षवर्धन वानखेडे यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त पाच उत्तेजनार्थ बक्षिसे आणि सहभागी 425 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांना आयोजन समितीच्या वतीने भारतीय जीवन विमा निगम बुलढाणाचे विकास अधिकारी राजेश गावली, आझाद हिंद संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे, श्रीजी इन्शुरन्स कंपनीचे संचालक नितीन तापडिया, सौ. ममता तापडिया, आझाद हिंद अल्पसंख्यांक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असलम शाह, रोहिदास सरसांडे, शेख इसाक, कु.आदिती मुगदल, हर्षल जाधव, सौ.रुपाली डिडोळकर, सौ. आरती देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन निकाल जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धेतील सहभाग आणि यशस्वीतेसाठी भारतीय इंग्लिश स्कूल संचालिका सौ.रेखा गवई, जेजे स्कूल ऑफ स्कॉलर मुख्याध्यापिका सौ.प्रिया मिश्रा, महात्मा ज्योतिबा फुले कॉन्मेंट मुख्याध्यापक अविनाश सुरळकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहीद मुख्याध्यापक धंदर यांनी अथक परिश्रम घेतले.
