विवाहीतेने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या* चिखली तालुक्यातील भरोसा येथील घटना

विवाहीतेने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
* चिखली तालुक्यातील भरोसा येथील घटना

चिखली : (एशिया मंच वृत्त)
      तालुक्यातील भरोसा येथे  एका २६ वर्षीय विवाहितेने २१ महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन विहिरीत उडी घेऊन  आत्महत्या केल्याची एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर त्यांना काढायला एका तरुणाने विहिरीत उडी घेतली, त्या तरुणाचा देखील मृत्यू झाला. हा ६ नोव्हेंबरच्या रात्री १० च्या सुमारास हा थरार घडला. तरुणाला वाचवण्यासाठी आणखी एकाने विहिरीत उडी मारली, सुदैवाने विहीरीच्या काठावरील लोकांनी विहिरीत टाकलेली दोरी हाती लागल्याने त्यांचा जीव वाचला. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की,  शितल गणेश थुट्टे (२६) देवांश गणेश थुट्टे (२१ महिने) आणि सिद्धार्थ निंबाजी शिरसाट(३६) तिघेही रा. भरोसा, ता. चिखली अशी मृतकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार काल सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शितल ने चिमुकला देवांश यांच्यासह गावातील दिनकर सदाशिव जाधव यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत जाऊन आत्महत्या केली. घरी न परतल्याने महिलेची शोधाशोध केल्यानंतर घटना उघडकीस आली. रात्री १० च्या सुमारास गावातील सिद्धार्थ निंबाजी शिरसाट या तरुणाने मायलेकांना बाहेर काढण्यासाठी विहिरीत उडी मारली, मात्र रात्रीचा अंधार, विहिरीतील गाळ यामुळे त्याचाही मृत्यू झाला. सिद्धार्थ पाण्याबाहेर न आल्याने त्याला वाचवण्यासाठी सुगदेव त्र्यंबक थुट्टे (५५) यांनी विहिरीत उडी मारली, असता त्यांचा दम घुमटत असल्याचे  विहिरीच्या काठावर असलेल्या लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोर टाकल्याने त्यांचे प्राण वाचले.