सॅम बहादुर चित्रपटाचं ट्रेलर रिलीज* चिखलीचा फौजी ज्ञानेश्वर आनकर झळकनार चित्रपटात

सॅम बहादुर चित्रपटाचं ट्रेलर रिलीज
* चिखलीचा फौजी ज्ञानेश्वर आनकर झळकनार चित्रपटात
चिखली : (एशिया मंच वृत्त)
     बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा हा सॅम बहादुर या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून सॅम बहादुर हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामधील विकी हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. 
      विकीनं सॅम बहादुर या चित्रपटाचे ट्रेलर  13 ते 14 ऑक्टोबर रोजी रिलिज झाले असून 1 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. तरी चित्रपटात चिखली येथील सैनिक ज्ञानेश्वर आनकर हा चित्रपटात झळकणार असून नुकताच प्रदर्शित झालेल्या डिझरमध्ये झळकलेल्या गाण्यामध्ये "ज्वाला माता की जय" म्हणत घोषणा देतानाचा मुख्य रोल मिळाला आहे. त्यामुळे चिखलीकरचा बॉलीवूडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.