पोस्ट कोविडसाठी सरसावले डॉक्टर शोण चिंचोले* शिवजयंतीचा दिवाळीत आरोग्यम् धनसंपदाचा गजर* जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे सहकार्य

पोस्ट कोविडसाठी सरसावले डॉक्टर शोण चिंचोले
* शिवजयंतीचा दिवाळीत आरोग्यम् धनसंपदाचा गजर
*  जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे सहकार्य 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       शिवजयंती चे कार्य ऐकूण आता थक्क व्हाल.19 फेब्रुवारी केव्हाच संपली ..पुढची शिवजयंती येत आहे. मात्र वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम देऊन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोण चिंचोले यांनी हे वर्ष अक्षरशा: गाजवुन सोडले. कोरोना नंतर अनेक शारीरिक व्याधी, समस्या उद्भवत आहेत. त्यात हृदयविकार, अस्थमा आदींचा समावेश आहे. शिवजयंती आता या आजारावर कार्य करणार असून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद याचे सहकार्य घेतले जात आहे. दिवाळीत हा आगळावेगळा आरोग्य धनसंपदा कार्यक्रम होत आहे.
       कोरोना झालेल्या रुग्णांना त्यावेळी करावा लागलेला भरपूर औषध उपचार, लस व अन्यकारणाने हृदय विकार अस्थमा समस्येत वाढ होत आहे. डॉ. चिंचोले स्वतः सर्जन असल्याने व ही समस्या बरीच दुर्लक्षित होत असल्याने त्यांनी पोस्ट कोडवर कार्य सुरू केले आहे.आजाराचे निदान व उपचार यावर भर दिला जाणार असल्याचे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सचिव सुनील सपकाळ यांनी म्हटले आहे.

* डॉक्टर संघटनांचे कवच : 
       रुग्ण शोधणे, योग्य तो औषधोपचार, समुपदेशन ,आहार आदीसाठी डॉक्टर संघटना सरसवल्या आहे. आययमए, डेंटल असोसिएशन, निमा डॉक्टर संघटना , होमिओपॅथिक असोसिएशन, युनानी, मानसिक उपचार तज्ञ ,आहार तज्ञ आदींचे सहकार्य यासाठी घेतले जात आहे. पोस्ट कोडचा रुग्ण असल्यास त्याची माहिती समितीला दिली जाईल. अशा रुग्णावर योग्य तो औषधोपचार तज्ञाकडून केला जाणार आहे.

 * जाणीव जागृती कार्यक्रम : 
       एखादा रुग्ण पोस्ट कोडचा आहे अस निदान झाले तर त्याची माहिती हेल्पलाइन सेंटरवरून संबंधित डॉक्टरांना दिली जाईल. डॉक्टरांची टीम त्यावर कार्य करेल. पोस्टकोवडची लक्षणे कशी आहेत याविषयी जाणीव जागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणांची मदत देखील घेतली जात आहे. यासाठी समन्वय समिती व टोल फ्री नंबर दिला जाणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दिवाळीत जिल्हाधिकारी करणार आहे.

* शिवजयंती असावी तर अशी!
      शिवाजी महाराजांनी लोकांसाठी कार्य केले. त्यांचे कार्य लोकोद्धाराचे होते. रयतेला महाराज आपले वाटले. त्यांची जयंती लोकाभिमुख करून डॉक्टर चिंचोले यांनी आगळे वेगळे शिव कार्य केले. गरजू रुग्णांना योग्यवेळी उपचार देणे खरे शिवकार्य आहे. पोस्ट कोडवर कार्य सुरू करून डॉक्टर चिंचोले यांनी दिवाळी आरोग्यम् धनसंपदाच्या रूपाने साजरी करण्याचा प्रयत्न केला आहे.