* मेहकर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
अवैध सावकारांकडून प्लॉट घेण्यासाठी एका महिलेने पैसे घेतले होते, ते पैसे परत करण्यासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी अवैध सावकारांनी केलेल्या मानसिक छळातून महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शबाना फिरोज शेख (वय ३७) असे मृतक महिलेचे नाव आहे़. याप्रकरणी तिघांविरुद्ध मेहकर पोलिसांनी २७ ऑक्टाेबर राेजी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
मृतक महिलेचा पती फिरोज शेख वादामिया (रा. मेहकर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी शबाना फिरोज शेख हिने प्लॉट खरेदी करण्यासाठी शबाना शेख रशीद (रा. जानेफळ वेस, मेहकर), बाबाखान जफरखान (रा. बागवनपुरा, मेहकर) आणि रोहन शिंदे (रामनगर, मेहकर) यांच्याकडून रक्कम व्याजाने घेतली. रकमेच्या परतफेड करण्यासाठी वर नमूद तिघांनी माझ्या पत्नीला सतत मोबाइलवर कॉल करून आणि घरी येऊन धमक्या दिल्या.
त्यामुळे या मानसिक छळलाने कंटाळून तिने 18 ऑक्टोंबर रोजी घरी गळफास लावून लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर पहिले मेहकर नंतर संभाजीनगर येथे दवाखान्यात उपचार करण्यात आले परंतु तिचा 27 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. तिन्ही आरोपी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी फिरोज शेख यांनी केली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी त्यांनी तिन्ही अवैध सावकारांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील कारवाई पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गणेश कडू करीत आहेत.
