धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी घनश्याम राजेंद्र ढोले वर गुन्हा दाखल करा * भाविकांची निवेदनाद्वारे मागणी

धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी घनश्याम राजेंद्र ढोले वर गुन्हा दाखल करा 
 * भाविकांची  निवेदनाद्वारे मागणी 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      अमरावती येथील घनश्याम राजेंद्र ढोले अनंतवाडी याने समर्थ वाडी येथील धार्मिक संस्थान आणि विश्वस्थानवर केलेल्या खोट्या व निराधार आरोपामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे भाविकांनी लेखी तक्रार देऊन 21 ऑक्टोबर 2023 रोजी केली आहे.
     दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, समर्थवाडी अमरावती हे धार्मिक संस्थान असुन राज्यांसह देशभरात या संस्थानचा मोठया प्रमाणात भाविक वर्ग आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रसिध्दीच्या मागे न लागता संस्थानचे प्रमुख विश्वस्थ असलेलं 95 वर्षीय मा.पुज्य भाऊसाहेबांनी आपल्या हयात भर श्री समर्थ योगीराज गोविंद महाराज माकनेर यांनी घालून दिलेल्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरा अविरत सुरु ठेवलेल्या आहेत. त्याकरीता त्यांनी आपल्या हयातीत अपार श्रम सोसलेले आहे. असे मा. पुज्य भाऊसाहेब आमच्यासाठी दैवत आहेत. अशा आमच्या देवतावर धनश्याम राजेंद्र ढोले सारख्या विकृत मानसिकता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या धादांत खोटे तथा तथ्यहिन आरोप केल्याने आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोचलेली आहे. अशा विकृत व विघ्न संतोषी व्यक्तीवर आमच्या धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी तात्काळ संबंधीता विरुध्द गुन्हे दाखल करावे. अशी तक्रार संबंधीता विरुध्द बुलडाणा येथील बहुसंख्येने हजर असलेल्या सर्व भाविक मंडळींनी केली आहे.