लोणार : (एशिया मंच वृत्त)
वन्यजीव सप्ताहा निमित्त'मी लोणारकर' टीम व वन्यजीव विभाग मेळघाट यांच्या सयुक्त विद्यमानाने 7 ऑक्टोबर 2023 रोजी लोणार अभयारण्याभोवती सायकल रँली काढण्यात आली.
यावेळी रॅलीमध्ये सहभागी 280 सायकल स्वरांनी लोणार सरोवराची परिक्रमा यशस्विपने पूर्ण केली. मानव व वन्यजीव यांचे मैत्रीपूर्ण नाते कायम राहावे यासाठी दरवर्षी वन्यजीव विभागाच्या वतिने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यावेळी ही वन्यजीव सप्ताह निमित्त विद्यार्थ्यासाठी सायकल रॅली , चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धामध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम ,द्वितीय, आणि तृतीय आलेले शुभांगी विष्णू बाजड, पलक राजेश आढाव, प्राची प्रवीण जायभाये, श्रुती गजानन बगाडे, पूजा ज्ञानेश्वर शिंगणे, सायली शंकर राठोड, रुपेश विजय कोचर या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सरदार वल्लभ भाई पटेल हायस्कूल च्या प्रांगनात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुने म्हणून विभागीय अधिकारी वन्यजीव विभाग अकोला निमजे साहेब, निमेश मेहेत्रे पोलिस निरिक्षक, घोगरे सहाय्यक पोलिस निरिक्षक, प्रकाश सावळे , वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड , सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक रामेश्वर डोळेे, वाघ सर, सांगळे सर, इंगळे सर, विजय जागृत सर व त्यांचा कर्मचारीरुंद उपस्थित होते. या वन्यजीव सप्ताहाच्या आयोजनासाठी सर्पमित्र विनय कुलकर्णी, बंटी नरवाडे, विलास खरात, मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे, संतोष जाधव, विजय गोरे, समीर शहा, गोपाल सरकटे, रवींद्र तायडे, प्रकाश सानप, भूषण सानप, रोहन सोसे, सुशील सोसे, उमेद चिपडे, सचिन मस्के, शैलेश सदार, अमोल सरकटे, ज्ञानेश्वर कचरे, विनोद थोरवे व संपूर्ण 'मी लोणारकर' टीम तसेच वन्यजीव विभागाचे सुरेश माने, सुनिता मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, सदाशिव वाघ, गजानन शिंदे, निरंजन पोले इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी संतोष जाधव यांनी केली तर बक्षीस वितरण कविता आघाव यानि केले. वनपरिक्षेञ अधिकारी निमजे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोणारचे पोलिस निरीक्षक निमेश मेहेत्रे यांनी वनांविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी सापांविषयी उत्तम माहिती करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे यांनी केले. २८० च्या वर सायकल स्वारानी पर्यावरण वाचविन्यासाठी या सायकल रॅलीमध्ये सहभागी होते. पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. शहरात सायकल चालविणाऱ्यांची संख्या आणि त्यांना शहरात वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी शहरातील रस्त्यावर सायकल ट्रॅक बनविण्याची मागणी ही यावेळी सायकल स्वरांनी केली आहे.
