बालपनीच्या आठवणीत रमले ७५ मित्र - मैत्रीणी * प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शासकीय शाळांना केली भरगोस मदत

बालपनीच्या आठवणीत रमले ७५ मित्र - मैत्रीणी * प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शासकीय शाळांना केली भरगोस मदत 
लोणार : (एशिया मंच वृत्त)
           काय रे? ओळखलंस का?". स्नेह संम्मेलनात भेटलेल्या सर्वांची हीच बिकट अवस्था त्यांच्या चेहर्‍या वरून दिसून येत होती.अनेकांनी सपशेल शरणागती पत्कारत, "नाही बुवा" अशी कबुली दिली... "अरे मी .. आपण शाळेत एका वर्गात होतो." ५० वर्षा नंतर आयुष्या पन्नाशिकड़े जात असतांना येथील महाराष्ट्र पर्यटन संकुलावर १९८० - ८५ च्या काळातील ७५ जूने क्लासमेट तब्बल ५० वर्षानी भेटले .... दहावी नंतर हे सर्व मित्र - मैत्रीनी तब्बल ४५ पेक्षा जास्त वर्षांनी भेटत होते. सगळे साठीला टेकलेले. पण त्यांच्या बोलण्यातून ते 'गोल्डन इयर्स' परत जगत होते हे स्पष्ट दिसत होते.त्यांच्या बॅचचा एक पुनर्मिलन सोहळा  27 व 28 ऑक्टोबर 2023 या दोन दिवसात पार पडला.
      यास्नेह सम्मेलनाच्या माध्यमातून एकमेकांना भेटण्याची ही भन्नाट आयडिया साकारलीती लोणार चे सुपुत्र आणि सध्या नागपुर मध्ये आपल्या व्यवसाया निमित्त स्थायिक झालेले एसएमएस कंस्ट्रक्शन ग्रुप चे दिलीप सुराणा, आकोला येथील उद्योजक शैलेश खटोड़, खामगांव येथील अरुणा झांबड, जिल्हा प्रमुख प्राबळीराम मापारी, सुनिल गोलेच्छा, अजय हाडोळे, डॉ. अनिल मापारी यांच्यामुळे यासर्वानी आपल्या जुन्या मित्रांना एका व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून एकत्रीत केले. माळेतील एक-एक मन्या प्रमाणे या सर्वानी आपल्या वर्गातील एक एक मित्र शोधून काढला. सर्वकामनिमित्त मुंबई, पुणे, संभाजीनगर, मद्रास, नागपुर यासारख्या ठिकाणी शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय, बँकिंग, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहे. या सर्वाना दिलीप सुराणा यांनी प्रत्यक्ष संपर्क साधुन दोन दिवसाच्या स्नेह संम्मेलनाच्या कार्यक्रमाला येण्याचे आग्राहाचे निमंत्रण दिले. तीन महिन्या पासून या दोन दिवसीय स्नेह संम्मेलनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती आणि प्रत्यक्ष जेव्हा 27 तारीख आली तेव्हा सकाळी पर्यटन संकुलावर एक्साईटमेंट वाढत होती. धावत पळत ठरलेल्या वेळेपेक्षा सगळेच मित्र भेटण्याच्या आतुरतेने वेळेवर पोहोचले. हळू-हळू मित्र जमत होतं बहुतेक जण एकमेकांना ओळखू आले. काही जण मात्र अक्षरशः परकाया प्रवेश केल्या सारखे वेगळंच शरीर धारण करून आले. पण कार्यक्रमस्थळी पोचल्यावर मात्र सगळे परत लहान होऊन गेले आणि ओळखीचे वाटायला लागले. तशीच लहान असताना चालणारी चिडवा- चिडवी चालू झाली. जुने सगळे संदर्भ परत आठवायला लागले. नुसते आठवतच नव्हते तर ते साक्षात समोर दिसत असल्याने काही जण आणि 'जणी' सुध्दा अंमळ हरवले होते. त्यांच्या वेळच्या दहावीच्या सगळ्या वर्गांचे ग्रुप फोटो सेशन झाले. यावेळी या सर्वांचे शिक्षक आणि मित्र जे आज हयातीत नाही त्यांची ही आठवण करून त्यांचे फोटो एका बँनरवर लावले होते. आपले स्वतःचेच जुने चेहरे बघून दुसर्‍यां पेक्षा या सर्वांना स्वतःचंच हसू येत होतं. दरम्यान एक-एक शिक्षक यायला सुरूवात झाली. माजी प्राचार्य रेदासनी सर, ज.ह. खरात सर, पांडूरंग कुलसुन्दर सर, सातवसर, खिल्लारेसर, जोगड सर, सरांना इतक्या वर्षांनी भेटत होते, सर्वच निवृत्त झाले होते. वयं झाली होती. काही जण तरलोणार सोडून गेले होते.पण केवळ आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी दगदग सोसून जिद्दीने मुद्दाम हजर राहिले. ५० वर्षांत बरीच उलथापालथ झाली असली तरी शिक्षकांचा हात पाठीवर आहे हे यावेळी जाणवलं. त्यांना वाकून नमस्कार करताना उगाचच भरून येत होतं. गंमत म्हणजे सगळ्यांच्यात कितीतरी फरक पडला होता तरी बहुतेकांना त्यांनी बरोबर ओळखलं. काही शिक्षक पुढच्या प्रवासाला निघूनगेले आहेत, त्यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रम सुरू झाला. स्नेहबंधनाच्या या कार्यक्रमा च्या उदघाटनाला जिल्ह्याचे खा. प्रतापराव जाधव, विदर्भ वैधानिक विकास महामंडालळाचे अध्यक्ष माजी आ. चैनसुख संचेती, आ. डॉ. संजय रायमुकर, मेडिकल असोशिएशन चे अध्यक्ष डॉ. के.बी. मापारी, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी, रमनलाल बोरा मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी सर्व मान्यवरांनी स्नेहबंधना च्या कार्यक्रमाला भर भरून शुभेच्छा दिल्या तसेच मैत्रीचा हा जिव्हाळा वयाच्या उतारपणात सर्वाना जगण्याची नवचेतना देणारा ठरणार असल्याने दरवर्षी सर्वानी एकत्रित येऊन दोन क्षण आपल्यासाठी देण्याचे आवाहन केले. स्नेहबंधनाच्या दुसऱ्यादिवशी यासर्व मित्रानी आपले प्राथमिक शिक्षण घड़लेल्या शहरातील मुलिंची कन्या शाळां, मुलांची बेशीक शाळां, श्री शिवाजी हायस्कूल या शाळांना भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी हे सर्व जुन्या आठवणीत रमले प्रत्येकाने आपल्या वर्ग खोलीत जाऊन जुन्या आठवणीना नव्याने उजाळा दिला. स्नेहबंधना च्या कार्यकमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. अजय महाजन यांच्या शर्वरी फार्म हाऊस वर सर्व मित्राणी स्नेह भोज केले शेवटी ४ वाजले आणि एक-एक जण निरोप घ्यायला लागला. होणार-होणार म्हणता-म्हणता हा कार्यक्रम झाला पण... आणि अतिशय मस्त झाला.५० वर्षानी झालेला मैत्रीचा हा मेळावा सगळ्यांच्या साठीच एक अविस्मरणिय दिवस होता. या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे यशस्वी रीत्या आयोजन केले. दिलीप सुराणा आणि रंजीत रेदासनी, संतोश शर्मा, अक्षय छाजेड़, राहुल भैया त्यांच्या सर्व सहकार्यानी आणि सर्व मित्राणी, डॉ
 अजय महाजन सर यांनी सर्वाना निरोगी राहण्याचा दिला धड़ा. शिवाजी हायस्कूल च्या वर्ग खोली क्रमांक १७ मध्ये देशाचे यासर्व मित्रांचे वर्ग मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेल्थ अँडव्हाइजर कोअर समितीचे सदस्य असलेले आणि देशातले प्रख्यात कार्डियोलोजिस्ट हृदयरोग   तज्ञ डॉ. अजय महाजन सर यांनी निरोगी आणि आपले आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी १ तासाचा क्लास घेउन महत्वाचे मार्गदर्शन केले. दिलीप सुराणा यांनी ही शिकवनी घेत सर्वाना शाळेच्या दिवसाची आठवण करून दिली. स्नेहबंधनांच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. बळीराम मापारी यांनी केले. त्यांनी हा सगळा कार्यक्रम कसा ठरला, नियोजन कसं झालं सांगितलं. आपल्या प्रस्तविक मधुन त्यांनी यावेळी खरं तर एकच संगीतले की, "आज आपण कोणीही असो, कसेही असो, कुठे असो... आपण आपल्या आयुष्यातली सर्वात अमूल्य चीज शेअर केली आहे... ती म्हणजे आपलं बालपण.गेली ५० वर्षं आपण दूर गेलो होतो पण आता मात्र कमीत कमी संपर्कात मात्र नक्कीच राहू. नियमितपणे जेवढे जमतिल तेवढे भेटत राहू." शाळेतल्या गंमतीदार आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.  स्नेहबंधनाच्या कार्यक्रमातून सर्व मित्रांणी जमा केलेल्या राशितुंन कन्या शाळां आणि बेसीक शाळेला सीसीटीव्ही कँमेऱ्याचे संच भेट दिले. तसेच अनाथ आणि गरजु मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च या राशितुन करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.