राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात
 देऊळगावराजा : (एशिया मंच वृत्त)
       स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 17 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान राज्यस्तरीय खो- खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनव्दारे क्लस्टर 9 राज्यस्तरावरीय खो-खो स्पर्धेच्या आयोजनासाठी दिल्ली बोर्डच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हयातून एकमेव राजलक्ष्मी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलची निवड करण्यात आली होती. राज्यभरातून 13 मुलांची टीम व 9 मुलींच्या संघानी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये आत्ममलिक स्कूल शिर्डी येथील मुलांची टीम विजेता झाली तसेच न्यू बॉम्बे सिटी स्कूल सीबीएसई मुंबई उपविजेता झाली व तिसऱ्या नंबरवर तुळशीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन स्कूल नांदुरा व मिलीनियम नॅशनल स्कूल पुणे यांचा तिस-या नंबर वर बाजी मारली व मुलीच्या टीममधून विजेता संघ मिलिनियम नॅशनल स्कूल पुणे हा संघ विजेता झाला व उपविजेता संघ भवन बीपी विद्या मंदिर स्कूल नागपूर व तिसऱ्या नंबरवर न्यू बॉम्बे सिटी स्कूल सीबीएसई मुंबई व आत्मामलिक स्कूल शिर्डी या संघ तिसऱ्या नंबर वर विजेता झाला.
        या स्पर्धेसाठी खो-खो चे विदर्भ असोशियन नागपूरचे पंधरा रेफ्रीजची टीम हजर होती. विजेता संघांना टीमला सुवर्णपदक, उप विजेता टीमला रौप्य पदक व तिसऱ्या क्रमांकवर विजयी झालेल्या टीमला कास्यपदक प्रदान करण्यात आले. राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे संस्था अध्यक्षा डॉ.सौ. मीनलताई शेळके व सचिव डॉ रामप्रसाद शेळके , प्राचार्य आदेश शर्मा व रेफ्रिज यांच्याहस्ते पदक वाटप करण्यात आले. सर्व खेळाडूंनी आपल्या मधील खेळाडू जिद्द दाखवून दिली. राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने राज्यस्तरीय खो-खोच्या स्पर्धाच्या नियोजनासाठी येणाऱ्या सर्व टीम व कोचेस आणि रेफ्रिजच्या राहण्याची, जेवणाची, ट्रॅव्हलिंग तसेच प्राथमिक उपचाराची व्यवस्था ठेवल्याबददल राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल व मॅनेजमेंटचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. 
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फैजल सर यांनी केले. यावेळी पंढरीनाथ भुतेकर, ज्ञानदेव भोसले,रामेश्वर इंगळे, देवेंद्र नरोटे,गणेश पंडित,बाळासाहेब गोजरे, राजेश पंडित, रिकी कांबळे,मंगेश टेकाळे,संतोष राठोड, ज्ञानदेव शेरे, अमोल हरणे, मुकुल गवई,योगेश गवई, रुस्तुम भुतेकर, गणेश जायभाये, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.