आ. संजय गायकवाड यांचा विकासाचा झंझावात कायम * जेष्ठ नागरीक भवन, सरकारी तलाव कलर फाऊंटनसह विकास कामासाठी 20 कोटी मंजूर

आ. संजय गायकवाड यांचा विकासाचा झंझावात कायम 
* जेष्ठ नागरीक भवन, सरकारी तलाव कलर फाऊंटनसह विकास कामासाठी 20 कोटी मंजूर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     बुलडाणा विधानसभा मतदार संघात सर्वांगिन विकासाची कामे करीत असतांना आ. संजय गायकवाड यांनी आपला विकासाचा झंझावात पुन्हा एकदा कायम ठेवला आहे. 19 ऑक्टोंबर रोजी शासनाच्या नगर विकास विभागाकडून मतदार संघातील विविध विकास कामासाठी 20 कोटीचा भरीव निधी मंजूर करुन आणला आहे. यामध्ये जेष्ठ नागरीकांसाठी भवन व मनोरंजन केंद्र, शिक्षक व ग्रामसेवक भवन, सरकारी तलावाचे सौदर्यीकरण व कलर फाऊटन, शहराच्या मुख्य रस्त्याचे विद्युतीकरण व सौदर्यीकरण आणि भव्य असे संभाजी महाराज भवन या सारख्या वेगळ्या, ऐतीहासिक विकास कामाचा सहभाग आहे.

        आ. संजय गायकवाड यांच्या सर्वदूर दृष्टीमुळे मतदार संघात कधी नव्हे, असा कृषि, शैक्षणिक, साहित्य, बेरोजगारीचे प्रश्न, शेतक-यांचे प्रश्न, सिंचन या सारख्या विविध क्षेत्रात विकासाची कोट्यावधीची कामे प्रत्यक्षात सुरु झाली आहे. अल्पावधीमध्ये मतदारसंघाचा कायापालट होत असतांना काल पुन्हा एकदा विकास कामासाठी 20 कोटीचा निधी खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे. यामध्ये खेळाडूंसाठी आर्टीफिशीयल टर्फ क्रिकेट मैदान तयार करण्यात येणार असून या कामासाठी 60 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मलकापूर रोडवरील जुन्या जकात नाक्याच्या जागेवर संत सेवालाल महाराजांचे स्मारक 50 लक्ष, महाविर नगर येथे धर्मविर संभाजी महाराज सभागृह 50 लक्ष, शहरातील सर्वात जून्या प्रगती वाचनालयाच्या इमारतीसाठी 20 लक्ष, शहरातील सर्वच खुल्या भुखंडावर ओपन जिम साहित्य बसविणे 1 कोटी 13 लक्ष, जेष्ठ नागरीकासाठी मनोरंजन केंद्र 1 कोटी 25 लक्ष, विविध स्मारकांच्या विद्युतीकरणासाठी 1 कोटी 75 लक्ष्ज्ञ रुपये शिक्षक भवनासाठी 90 लक्ष रुपये, ग्रामसेवक भवनासाठी 50 लक्ष, वैशिष्टपूर्ण म्हणजे क्षय आरोग्य धाम समोरील सरकारी तलावात फाऊंटन, लहान मुलांचे शेळाचे मैदान 3 कोटी रुपये, आणि त्रिशरण चौक ते हाजीमंलग दर्गापर्यंत दुभाजक विकास सौदर्यीकरण व विद्युतीकरणासाठी 50 लक्ष रुपये, सर्वात जुन्या मातृभूमी व्यायाम शाळेकरीता नवीन साहित्य, इमारत, सौदर्यीकरणासाठी 50 लक्ष रुपये, नाट्यगृहासाठी वाढीव 3 कोटी वसुंधरा स्थळाचा विकास 25 लक्ष रुपये, पथदिवे, विद्युत मिटरचे ऑटोमिशन 25 लक्ष, सर्वोदय कॉलनी महादेव मंदिर, सभामंडप 27 लक्ष रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

* प्रभाग 8 मध्ये दिड कोटींची कामे
      आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून एकट्या प्रभाग 8 मध्ये दिड कोटीची विकास कामे केली जाणार आहे. यामध्ये उदयकार यांचे घरासमोरील भुखंडावर चेनलिंग भिंत, सभामंडप व संत निरकांरी भवन, अशा विविध विकासाचा समावेश आहे. या भागातील नागरीकांमध्ये उत्साह संचारला आहे.