दसरा सणाच्या दिवशी हिवाळे परिवारावर काळाचा घाला..
भरधाव तवेराच्या धडकेत ; 1 ठार , 1 गंभीर
* केळवद जवळील घटना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)भरधाव वेगाने येणाऱ्या तवेरा कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत झालेल्या भिषण अपघातात एक जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना बुलडाणा ते चिखली महामार्गावरील केळवद जवळ आज 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपार दरम्यान घडली.
सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, तवेरा कारने इतकी जबरदस्त धडक दिली की दुचाकीला अंदाजे 40 ते 50 फूट उंच फेकल्या गेल्याने यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाला आहे. अपघातग्रस्थ हे शिरपूर तालुका बुलढाणा येथील रहिवासी आहे.
गंभीर जखमी युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. चिखली तालुक्यातील शिरपूर येथील दोन तरुण दुचाकीने बुलडाणाकडे येत होते. दरम्यान केळवद जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी बाजूला फेकल्या गेली. कारदेखील रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघातात २० वर्षीय तेजस कैलास हिवाळे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबतचा सार्थक सुनील हिवाळे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
