हिंगोलीत रविवारी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची बैठक

हिंगोलीत रविवारी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची बैठक
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची जिल्हास्तरीय बैठक रविवारी 3 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. 
    यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राम वाडीभष्मे, हिंगोली जिल्हा प्रभारी रवींद्र सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैठकीत संघटनेची रुपरेषा, ध्येयधोरणे, आगामी काळातील संघटनेची दिशा याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील समस्त ओबीसी समाजातील विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवेतील अधिकारी कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हा समन्वयक विशाल जिरवनकर यांनी केले आहे.