जालना जिल्ह्यातील घटनेची सखोल चौकशी करावी* सकल मराठा आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने

जालना जिल्ह्यातील घटनेची सखोल चौकशी करावी
* सकल मराठा आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     जालना जिल्ह्यात मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याचा आज सकल मराठा समाजाने निषेध नोंदवीत आज 2 ऑगस्ट 2023 दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. मराठा समाज शांत आहे, अंतपाहु नका अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
       जालना जिल्ह्यात संविधानीक मार्गाने आंदोलन करणा-या मराठा समाज आंदोलकांवर पोलीसांनी बळाचा वापर केला. या घटनेने राज्याचे राजकारण ढवळून निघत असतांना बुलडाण्यात सकल मराठा समाजाने तिव्र निदर्शने करीत निषेध व्यक्त केला. झालेली घटना पूर्वनियोजीत आहे की, कसे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे वेगवेळ्या स्तरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी निवेदन देतांना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समतीचे डॉ. शोन चिंचोले, सुनिल सपकाळ, डि.एस. लहाने, सुनिल जवंजाळ, राजेश हेलगे, सागर काळवाघे, दत्ता काकस, अॅड. विजय सावळे, नरेश शेळके, अमोल रिंढे, संजय हाडे, गणेश निकम, गणेश उबरहंडे, अॅड. राज देवकर, अॅड. संदिप ठेंग, अॅड. अमर इंगळे, प्रा. रामदास शिंगणे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, अनुजा सावळे, वंदना निकम, अनिल बावस्कर, मनिष बोरकर, सचिन परांडे, आशीष गायकी, विषाल फदाट, गौरव देशमुख, संभाजी पवार, आशीष काकडे, निलेश हरकळ, नितीन कानडजे, विनय मोटे, दिपक मोरे, रमेश बुरकूल, लक्ष्मण ठाकरे यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

* शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द करा
     राज्यात वातावरण बिघडत चालले आहे. मराठा समाज संतप्त आहे. अशावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहे. घटनेची तिव्रता पाहुण हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी मागणी आहे. – 
* सुनिल जवंजाळ पाटील, मराठा समाज नेते.

* ही घटना जानिव पूर्वक
      सदर घटना घडवून आणण्याचा प्रयत्न होता की काय हे पहाणे महत्वाचे आहे. लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले त्याला गालबोट लागले नाही. मात्र छोटे आंदोलनाला हिंसक स्वरुप कसे आले याची चौकशी व्हावी, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागेल.
* अमोल रिंढे, मनसे नते

* या घटनेचा निषेध
       मराठा समाजावर झालेला लाठी हल्ला निषेधार्थ आहे. याचा निषेध करावा तेव्हढा कमी आहे. मी याचा निषेध करतो. अमानुष मारहान प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
*  डॉ. शोन चिंचोले, अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती समिती, बुलडाणा.