परीस बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा

परीस बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        आपल्या अनेक सांस्कृतीक उत्सवांपैकी 'गणेशोत्सव ' हा एक मोठा उसृजनशिलतेतून निर्माण होणारी कलाकृती आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरण संवर्धन या सर्व बाबींचा विचार करून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
       दरवर्षी गणपती मूर्ती सर्वत्र विराजमान होत असतात. परंतु आपल्या अनेक सांस्कृतीक उत्सवांपैकी 'गणेशोत्सव ' हा एक मोठा उत्सव आहे.लहान मुलांना मातीशी खेळण्यातील आनंद, त्यांच्या सृजनशिलतेतून निर्माण होणारी कलाकृती आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरण संवर्धन या सर्व बाबींचा विचार करून हा उपक्रम आयोजित करण्यात आला, असे संस्थेच्या अध्यक्षा डॉ.माधवी जवरे म्हटल्या.
       बुलडाणा येथील सौ. वर्षा बोबडे ताई ह्या इको फ्रेंडली गणपती बनविण्याच्या उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात. "परीस बहुउद्देशीय संस्थेच्या" वतीने यावर्षी बुलढाण्यातील समस्त गणपती प्रेमींना ह्या कार्यशाळेसाठी आवाहन करण्यात आले होते. 
      दरवर्षी गणपती मूर्ती सर्वत्र विराजमान होत असतात. परंतु दहा दिवसांच्या नंतर याच गणपतींच्या विसर्जनाची वेळ येते, त्यावेळेस गणपती आपण नदी, तलाव,विहिरी किंवा समुद्रामध्ये विसर्जित करतो.त्यामुळे होणारे जलप्रदूषण हे आरोग्य हानिकारक असते.म्हणून इको फ्रेंडली गणपती बनवून आपण जलप्रदूषणला आळा घालू शकतो. हा विचार समोर ठेवून हे वर्कशॉप आयोजित केलेले होते.
या वर्कशॉप च्या यशस्वितेसाठी सौ. वर्षा बोबडे ताई आणि परीस बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. माधवी जवरे आणि कार्यकारी सदस्या सौ. सोनाली वाघ , सौ.राजश्री पाटील यांनी मदत केली.