रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलडाण्यात

रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलडाण्यात 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. श्री. शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारीचा जिल्हास्तरीय लाभ वाटप आणि शहर पोलिस ठाण्याचे लोकार्पण होणार आहे.
        मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या दौऱ्यानुसार, रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता बुलडाणा येथील कऱ्हाळे ले आऊट जवळील हेलिपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता कऱ्हाळे ले आऊट जवळ. परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेमागे, मलकापूर रोड, बुलडाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता बुलडाणा शहर पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 2.15 वाजता शहर पोलिस ठाणे येथून कऱ्हाळे ले आऊट जवळील हेलिपॅड कडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी 2.25 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.