* वंचित युवा आघाडीचे सतीश पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हा सध्या दुष्काळाच्या गर्तेत आहे. पाऊसच नसल्याने उभी पिके करपू लागली आहेत. कोमेजलेली पिके पाहून बळीराजाच्या डोळ्यातील आसवे आटली आहेत. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. ही दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी राज्य शासनाने रडार यंत्रणा कार्यान्वित करून कृत्रिम पाऊस पावसाचा प्रयोग यशस्वी करावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडून पावसाचा सरासरी दर वाढविणे गरजेचे असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी परतीच्या पावसाचे ढग पोषक ठरू शकतात. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता बळावली आहे. बुलढाणा जिल्हाही त्याच वाटेवर आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण पावसाळा संपत आला तरी कोरडेच आहे. केवळ पंधरा टक्के जलसाठा त्यात आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांचीही तिच परिस्थिती आहे. पाऊस नसल्याने शेतकरी खचून गेला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास अख्खा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे. तसेच मुक्या गुराढोरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतील. अतिशय गंभीर परिस्थिती पावसाअभावी येत्या काही दिवसांमध्ये निर्माण होऊ शकते.
बुलडाणा शहरातील बोअरवेलची पाणीपातळी घटली आहे. भरपावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा कराव लागत आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी तसेच पिके जगविण्याकरिता कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाशात ढग जमा होतात. यामुळे कृत्रिम पाऊस पाडणे शक्य होणार असल्याने मागील काही वर्षांप्रमाणे रडार यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी सतीश पवार यांच्यासह वंचितचे पदाधिकारी बाला राऊत, अर्जून खरात, अनिल पारवे, विजय पवार, किरण पवार, समाधान पवार यांनी केली आहे.