बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांचे N.C.C. शिबिरात सुयश

बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर च्या  विद्यार्थ्यांचे  N.C.C. शिबिरात सुयश
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      आपल्या मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात सहकार विद्या मंदिर ठसा उमटवितांना दिसत आहे. यामध्ये मागे नसल्याचे कु.उर्वी देशपांडे हिने बेस्ट कॅडेट अवार्ड सोबतच बेस्ट फायरिंग, बेस्ट ड्रिल, युध्द अभ्यास (फिल्ट क्रॉफ्ट, बॅटल क्रॉफ्ट) , रिटन टेस्ट, मा.कर्नल अमित भटनागर  यांच्यासोबत मुलाखात, यासह बेस्ट इंस्टुमेंट वादक यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत 1 मेडल व 1 मोमन्टो प्राप्त केला. यासह कु.श्रृती पाटील हिने सोलो सिंगिग मध्ये मेडल प्राप्त केले. सोलो डान्स यामध्ये कु.प्रियांशी बिबे, कु. प्रेरणा चौधरी यांनी प्रत्येक एक-एक मेडल प्राप्त केले. यासह कु.मृदुला भिसे हिने बेस्ट फायरिंग मध्ये मेडल प्राप्त केले. ग्रृप डान्स मध्ये चि.नयन गायकवाड व त्याचे सहकारी यांनी प्रथम येत मोमन्टो प्राप्त केला व मानाचा तुरा रोवला.  
      13 महाराष्ट्र बटालियन, खामगांव (वाडी) येथे  3 ऑगष्ट 2023 ते 12 ऑगष्ट 2023 दरम्यान 10 दिवसाचे निवासी वार्षिक प्रशिक्षण शिबिर पार पडले. N.C.C. च्या अमरावती ग्रृप मधुन तब्बल 400 कॅडेटस यांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. 10 दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना  आत्मसंरक्षण, देशसंरक्षण, मॅपरीडींग, ड्रील, हत्यार, समाजसेवा या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. सहकार विद्या मंदिरच्या 46 कॅडेटसनी या शिबिरात सहभाग नोंदविला. 13 महाराष्ट्र बटालियन कमांडीग ऑफीसर कर्नल अमित भटनागर याच्या हस्ते कॅडेटस यांना पदक व मोमन्टो प्रदान करण्यात आले.
तसेच शाळेच्या इतर कॅडेटस ने 10 दिवस चाललेल्या विविध उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध बक्षिसे मिळविली. सर्व सहभागी कॅडेटसला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. N.C.C. कॅडेटच्या या यशासाठी 13 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल अमित भटनागर, आर.एम. धर्मेन्द्रसिंग, शाम जामोदे, सुबेदार राजेद्र ढगे सर, ड्रिल मास्टर राजेंद्र पाल सर यांनी परिश्रम घेतले.

     संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमल झंवर, प्राचार्य व एन.सी.सी. अधिकारी राजु हिवाळे यांचे
विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यामध्ये  चि.आराध्य नायकर, अमर उबरहंडे, आनंद कुंटूले, आर्यन वाघ, अर्वन कंकाळ, अविष्कार जाधव, भार्गव जाधव, चैतन्य तिडके, दर्ष कारिया, देव सुगंत, हर्षित बालसराफ, ऋषीकेश बोबडे, कुणाल बुरकुल, लिनेश बोरले, नयन गायकवाड, ओम वायाळ, पार्थ शेवाळे, प्रणय उबाळे, रितेश खराटे, रुखमिनंद म्हैसने, श्लोक भोसले, सुमित घुगे, स्वयं बोराळकर, तन्मय तरमळे, यश डोंगरदिवे, यशास खराटे, योग जैन, कु.अभिज्ञा देशपांडे, अक्षरा वट्टमवार, अमुल्या तातेड, अंतरा बुजाडे, ईशीता काटकर, मेघा संचेती, मृदुला भिसे, मुक्ता खेडेकर, नेतल बाहेती, प्रेरणा चौधरी, प्रिषा मुकूंद, प्रियांशी बिबे, राजश्री लांडे, शर्वरी इंगळे, श्रृती पाटील, श्रृती राजपूत, श्रृतीका काटकर, उर्वी देशपांडे, वेदीका पल्हाड यांचा समावेश होता.
____________________________________