पायदळी तुडविल्या जाणारी लोकशाही जिवंत ठेवण्याची ताकद फक्त कॉग्रेस पक्षात आहे : राहुलभाऊ बोंद्रे* भाजप नगरसेवक कुळकर्णी व राकॉचे रिक्कीभाऊ काकडे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह कॉग्रेस प्रवेश

पायदळी तुडविल्या जाणारी लोकशाही जिवंत ठेवण्याची ताकद फक्त कॉग्रेस पक्षात आहे : राहुलभाऊ  बोंद्रे
* भाजप नगरसेवक कुळकर्णी व राकॉचे रिक्कीभाऊ  काकडे यांचा असंख्य  कार्यकर्त्यांसह कॉग्रेस प्रवेश 
 चिखली : (एशिया मंच वृत्त)
       असंख्य स्वातंत्र विरांनी आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात दिल्याने देशाला स्वातंत्र मिळुन देशाला घटना व लोकशाहीचे अधिकार प्राप्त झाले. मात्र केंद्रात मनुवादी विचार सरणीचे मोदी सरकार स्थापन झाल्यापासुन दिवसाढवळया घटना जाळल्या गेली तर दुसरीकडे लोकशाही पायदळी तुडविण्याचे पातक कार्य देशात सध्या सुरू आहे. या आगडोंबाची झळ अनेक वर्षापासुन भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुध्दा होरपळुन जात आहे. अशा या बिकट परिस्थीतीला तोंड देत असतांना मनुवादी व भाजपा सरकारकडुन पायदळी तुडविल्या जाणारी लोकशाही जिवंत ठेवण्याची ताकद केवळ कॉग्रेस पक्षातच असल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी चिखली येथे केले. भाजपाचे नगरसेवक तथा जेष्ठ कार्यकर्ते बंडुभाऊ कुळकर्णी व राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा सचिव रिक्की काकडे व माजी नगरसेवक शेख खैरूभाई यांनी राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी राहुलभाऊ  बोंद्रे बोलत होते.
       स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जेष्ठ नगर सेवक बंडुभाऊ  कुळकर्णी, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा सचिव रिक्की काकडे, तथा माजी बांधकाम सभापती शेख खैरूभाई या हाडामासाच्या पदाधिका-यांनी त्या-त्या पक्षात होत असलेल्या घुसमटीला कंटाळुन आज भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात आपल्या शेकडो समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. 
       यावेळी व्यासपिठावर कॉग्रेसच्या विविध सेलसह, सहकार क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची  उपस्थिती होती. यावेळी रिक्की काकडे यांच्या सोबत आलेल्या 468 मध्ये हरीहर सोळंके, शुभम कापसे, चेतन इंगळे, अमोल वाघ, रजत तिडके, अजय साळवे, विक्की जाधव, रोहन गोहर, आनंद पचेरवाल, गणेश देशमुख, सागर साळवे, भावसिंग अवसरमोल, शास्वत मोरे, हर्ष काकडे, प्रसाद पवार, दिनेश  कोथलकर, समीर वाजगे, प्रतिक सावळे, सचिन गायकवाड, प्रतिक मोरे, राहुल मोहिते, पवन मोरे, शुभम मोरे, गोपाल मुळे, चैतन्य  मोतेकर आदिंचा समावेश आहे. 

      यावेळी पुढे बोलतांना राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले, गेल्या काही दिवसापासुन सत्ताधाऱ्यांकडुन हुकुमशाही पध्दत अवंलबविल्या जात असुन मनुवादी विचारसारणीच्या अंतर्गत लोकशाही पायदळी तुडविल्या जात आहे. विद्यमान लोकप्रतिनिधीची तुलना याच मतदार संघातील तत्कालीन महिला लोकप्रतिनिधी माजी आमदार सौ. रेखाताई खेडेेकर यांच्या कार्याचे दाखले देत यावेळी बोंद्रेंनी करून दिली. 

यावेळी शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, दिपक देशमाने, नंदुभाऊ सवडतकर, सभापती डॉ.संतोष वानखेडे, कुणाल बोंद्रे, डॉ. इसरार, सचिन बोंद्रे, प्रदिप पचेरवाल, रामभाऊ जाधव, मनोज लाहुडकर, रफीक सेठ, हाजी राउफभाई, दिपक खरात, राजु रज्जाक, गोकुळ शिंगणे , निलेश अंजनकर, विजय शेजोळ, शहेजादभाई, अमीनसेठ, जक्का भाई, नासेर सौदागर, राहुल सवडतकर, जय बोंद्रे, निरज चौधरी, खलील बागवान, सचिन शेटे, शेख जाकीर, बिदु इंगळे, पप्पु जागृत, मनोज जाधव, आष्विन जाधव, भारत मुलचंदानी, अॅड. प्रशांत  देषमुख, खलील बागवान, प्रदिप मोरे, पवन गवारे, रमजान चौधरी, मलीक जमदार, कैलास खराडे, कैलास जंगले, दिपक थोरात, बबलु शेख, हनी सोनवाल, बाशिद जमदार, डॉ. घुगे, अज्जुभाई, शकील भाई, मोहित घुगे, सोहिल शेख, कचरूबा सुरडकर, अजिम भाई यांच्यासह कॉग्रेस पक्षाचे विविध विभाग, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन विकास लहाने, डॉ. अमोल लहाने यांनी केले तर आभार प्रदर्शन  कृउबासचे संचालक जय बोंद्रे यांनी केले. यावेळी भारताचे चंद्रयानाची मोहीम यशस्वी  ठरल्याने सामुहीक राष्ट्रगिताने मानवंदना देत कार्यक्रमाची सांगता झाली.
____________________________________