खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपातून आरोपी निर्दोष मुक्त

खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपातून आरोपी निर्दोष मुक्त 
बुलडाणा  : (एशिया मंच वृत्त)
    तालुक्यातील सागवन येथील रहिवासी अनिल सुरुशे,अरुण हिम्मतराव निकाळजे व इतर २ यांचेवर सागवन येथील एका व्यक्तीवर विषप्रयोग करून व नंतर गळा आवळून खून करून पुरून टाकून पुरावा नष्ट केल्याचा आरोप होता. याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनला 302, 120 ब, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती हे प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. 
     प्रकरणात सरकारतर्फे एकूण ११ साक्षीदारांची साक्ष पडताळणी झाली आरोपीच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद व बचाव पक्षाचे मुददे मान्य करुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. स्वप्नील खटी  यांनी आरोपींची १९ ऑगस्ट २०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. निलेश सवडदकर व ॲड. धीरज गोठी यांनी काम पहिले. याप्रकरणी त्यांना ॲड.  जीवन गवई, ॲड.  प्रियंका श्रीवास्तव व सागर सवडदकर तसेच विधिज्ञ मदतनीस अविनाश हिवाळे यांनी सहकार्य केले.ॲड. निलेश सवडदकर यांनी आरोपीची बाजू अभ्यास पूर्ण  युक्तीवाद केल्यामुळे  आरोपींना निर्दोष मुक्त केले. दोन दिवसांपूर्वी ही ॲड. सवडदकर यांच्या जोरदार युक्तीवाद केल्यामुळेच पोस्को अंतर्गत  गुन्ह्यातील आरोपीची सुटका झाली.