* प्रा. नितेश कराळे करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त प्रा. नितेश कराळे एमपीएससी, युपीएससीच्या विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रम गर्दे सहभागृहात 13 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता पार पडणार असून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कार्यक्रमास जास्तीत जास्त अभ्यासक व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
बुलडाणा येथे बुद्ध भीम गीतांचा तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम 13 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता बुध्दभिम गिताचा कार्यक्रमास सुरुवात होईल. गर्दे हॉल येथे घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी पत्रकार संघ बुलडाणा जिल्हा तथा सक्षम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सुंदरखेडच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे खा. प्रतापराव जाधव, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सिईओ अभिता लॅण्ड सोल्युशन प्रा.लि.चे सुनील शेळके हे राहणार आहे. प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलिस अधिक्षक सुनील कडासने, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, आ.संजय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, मनोज मेरत, प्रसाद गाजरे, जालिंदर बुधवत, दिलीपराव जाधव, विजय सूर्यवंशी, डॉ. सुकेशजी झंवर, संतोष जाधव, संजय राठोड, नरेंद्र सोनारकर, आमदार राजेश एकडे, किरण मोरे, मनीषा पवार, माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्रीताई शेळके, सुनील सपकाळ, अंकुशराव वाघ, नंदिनी टारपे यांची उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमाचा समारोप रात्री 10 वाजता दरम्यान केला जाणार आहे. कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघ, बुलडाणा जिल्हा , तथा सक्षम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेने केले आहे.
* प्रा. नितेश कराळे करणार मार्गदर्शन
फिनिक्स करिअर अकॅडमी वर्धाचे संचालक नितेश कराळे यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन मिळावे, याकरिता पुरोगामी पत्रकार संघ, बुलडाणा जिल्हा तथा सक्षम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विष्णू कंकाळ आदिनी मागणी केली होती. सदर मागणीस प्राधान्य देत कराळे यांनी बुलडाणा येथे येण्याचे आश्वासन कंकाळ यांना दिले होते. त्या अनुशंगाने कराळे यांनी आपला शब्द पाळत वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त ते मार्गदर्शनासाठी येत आहेत.
