विद्युत करंट लागून मृत्यूप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल

 विद्युत  करंट लागून मृत्यूप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल

लोणार : (एशिया मंच वृत्त)
     शेतातील पिके जंगली जनावरांनी नष्ट करू नये म्हणून शेताला तारकुंपन करून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडल्याने एका 35 वर्षीच युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 27 जुलै 2023 रोजी घडली होती. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन 5 ऑगस्ट 2023 रोजी लोणार पोलीस स्टेशनला तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  अधिक वृत्त असे की, काळ्या पाणी धरणावर लोणार येथून काही अंतरावर असलेल्या काळ्या पाणी तलावात शेख कय्युम शेख नुरमंहमद चौधरी वय 35 हा मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान सुदेश रामराव मापारी, शिवा रामराव मापारी यांनी आपल्या शेतात जंगली जनावरे येऊ नये म्हणून, तार कुंपनात विदयुत प्रवाह सोडलेला होता मात्र याची कल्पना शेख कय्युमला नसल्याने कुंपनातील तारेचा करंट लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कय्युमच्या मृतदेहाबाबतचा पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या शेतापासून ४०० मीटर अंतरावर सदर मृतदेह नेवून टाकला. याबाबत मृतकाची पत्नी परवीन शे. कय्युम  यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी सुरेश रामराव मापारी, शिवा रामराव मापारी , चतुर्भुज फोलाने यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, २०१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निमित मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे ,संतोष चहाण, ज्ञानेश्वर शेळके, संजय जाधव हे करीत आहेत.