जिजामाता महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी सायन्स फेअर कार्यक्रम संपन्न

जिजामाता महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी सायन्स फेअर कार्यक्रम संपन्न
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       स्थानिक जिजामाता महाविद्यालयात 4 ऑगस्ट 2023 रोजी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यावतीने मायक्रोबायोलॉजी सायन्स फेअर - 2023 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
      अध्यक्षस्थानी प्राचार्य. डॉ. प्रशांत कोठे होते. अकोट येथील शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी. व्ही. अतकरे, भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. जी. आर. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी विषाणूजन्य, जीवानुजन्य, पसरणारे रोग यांची माहिती यावर आधारित मॉडेल तयार केले होते. परीक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व त्यांची आवड तपासली. विद्यार्थ्यांच्या शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. 
      या प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक धनश्री लाटे, द्वितीय गोपाल इंगळे तर तृतीय क्रमांक सृष्टी गवळी हिने मिळवला. परीक्षक म्हणून डॉ. विकास पहुरकर, डॉ. राजश्री येवले, प्रा. संजय सावळे व प्रा. रामेश्वर बनकर यांनी कार्य केले. संचालन सृष्टी गवळी तर आभार मयुरी भुतेकर यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. आंधळे, प्रा. सुबोध चिंचोले, प्रा. डॉ. राहुल उके, प्रा. अनंत मोरे, प्रा. डॉ. योगेश रोडे, प्रा. पवन ठाकरे, प्रा. डॉ. ढाले, प्रा. पैकिने, प्रा. प्रवीण सरकटे, प्रा. स्नेहा कोल्हे, प्रा. रेणुका राजपूत यांनी परिश्रम घेतले.