वंचितमध्ये बहुजन व मुस्लिम बांधवांचा पक्षप्रवेश

वंचितमध्ये बहुजन व मुस्लिम बांधवांचा पक्षप्रवेश
 
धामणगाव बढे : (एशिया मंच वृत्त)
         मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे   येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन व मुस्लीम बांधवांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी वंचितमध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला.       यावेळी डोंगरे यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना पक्षाचे ध्येयधोरणे याबद्दल मार्गदर्शन केले.
 या कार्यक्रमास वंचितचे जिल्हाअध्यक्ष भिमराव सिरसाट, तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे, महासचिव विशाल मोरे, उपाध्यक्ष जनार्दन झिने, गौतम तायडे, तालुका सचिव संजय खराटे, भास्कर गवई, उमेश सोनोने यांची उपस्थिती होती. यावेळी विशालभाऊ चव्हाण, राजू सोनोने, प्रशांत बोदोडे, प्रमोद शिरतुरे, कमलाकर सोनोने, राजू गायकवाड, सागर उजागर, सचिन अहिरे, मंगलशिंग बच्चीरे हे उपस्थित होते. 
     यावेळी धा.बढे येथील सद्दाम कुरेशी, आक्रम कुरेशी, इम्रान कुरेशी, रवी गिरी, गणी तळवी, शेख रफिक, कलीम कुरेशी, अनिश कुरेशी, युसूफ शेख, अब्बू शेख, नाझिम पठाण, सचिन हिवाळे, काजीम कुरेशी, अमरदीप चव्हाण, शेख फिरोज, अब्दुल कुरेशी, शेख मुजफर, सय्यद फारूक, नुमान पटेल, शेख इम्रान यांनी वंचितमध्ये प्रवेश घेतला.