बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सद्भावना सेवा समीती द्वारा राजे मंगल कार्यालय येथे, शिव महापुराण कथा सुरु आहे. अयोध्या येथील अंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त प्रवक्ता भार्गव श्री मुनीशजी महाराजांच्या अमृतवाणीतुन कथा सुरु आहे. लक्ष्मी नारायण विवाह उत्सव सुंदर झाकी सह साजरा करण्यात आला. या प्रसंगात सौ. कोमलताई सुकेश झंवर सहभागी झाल्या होत्या. यावेळी सर्व समाजातील महिलांचा शिवमहापुराण कुथेतील सहभाग पाहून, 'सद्भावना सेवा समीतीने सर्व समाजातील महिलांना एकत्र जोडले असे उद्गार सौ. कोमलताई सुकेश झंवर यांनी काढले.
यावेळी व्यासपीठावर सौ. कोमलताई झंवर, सौ. अर्पिता शिंदे, कमलनयन लाहोटी, अतुल लाहोटी, ममता लाहोटी, विजय शर्मा, मार्मा शर्मा, बसनराव परांजपे, अंजली परांजपे यांनी आरती करुन पुष्पमाला अर्पण केली.
लक्ष्मी नारायण विवाहामध्ये लक्ष्मी च्या भूमीकेत डॉ. सुकेशजी झंवर याची मुलगी कू. कनिष्का सुकेशजी झंवर, आणि अतुल लाहोटी यांची मुलगी कुमारी वैष्णवी अतुल लाहोटी नारायणाच्या भुमीकेत शोभायमान दिसत होती. माहेश्वरी समाजाच्या सर्व महिलांनी व सौ. कोमलताई मंगल वाद्यात वाजत गाजत वर वधूंना व्यासपीठावर आणले. भार्गव श्री मुनीश महाराज यांनी गरबा गीत म्हटले, पूर्ण मंडपात सर्व महिला
लक्ष्मी नारायणाला घेर देऊन नाचत होत्या. 6 ऑगस्ट 2023 रोजी कथेच्या नवव्या दिवशीचे नियोजन वर्मा समाज, मराठा समाज महिला मंडळ, गुजराती समाज महिला मंडळ यांच्याकडे होते. यामध्ये, किरण वर्मा, दीपा वर्मा, गीता रघणी, डिपल पटेल तर मराठा मंडळामध्ये औ. शारदा उबरहंडे, विद्या वाघ, दीपाली खेडेकर, शोभा वाघ, दुर्गा कालवाघे , लक्ष्मी शेळके, नंदा सावळे, प्रिया पऱ्हाड, निता काळवाघे, निता तायडे, उषा काकडे, शैला जाधव, वैशाखी जाधव, वैशाली शेळके, श्रुतिका बाहेकर, पुष्पा पाटील , पौर्णिमा जगताप, प्रिया धंदर, किरण धंदर, सुलीचना इंगळे यांनी सकाळ- पासून आरती तयारी , व्यासपीठ सजावट, प्रसाद करप ही सर्व तयारी केली. रुद्राभिषेकामध्ये राजेश भूषणजी अग्रवाल, सौ. अर्पिता शिंदे, प्राचार्य प्रदीप जावंधिया, चंपालाल शर्मा, सुभाष घोरपडे, लक्ष्मी शेळके, आनंद वर्मा, लाला माधवाणी, सौ. शारदा उबरहंडे, चोथमल कुमावत, सौ. मंगला ताठे यांचा सहभाग होता. अयोध्या येथील आचार्य पुरुषोतम शास्त्री यांनी सर्वांकडून अभिषेक व पूजा करुन घेतली. समीतीच्या सर्व सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. यावेळी डॉ. सुरेशजी सेवर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. लाला माधवाणी यांनी आभार मानले.
