दर्पण समाजसेवा गौरव पुरस्काराने राजेंद्र काळे सह ६ पत्रकार सन्मानित

दर्पण समाजसेवा गौरव पुरस्काराने राजेंद्र काळे सह ६ पत्रकार सन्मानित 
शेगाव : (एशिया मंच वृत्त)
       पत्रकारांसाठी झटणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या नागपूर येथील दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन द्वारा दै. देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांचेसह बुलडाणा जिल्ह्यातील सहा पत्रकारांचा समाज सेवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
      २६ ऑगस्ट २०२३ रोजी शेगाव येथील विश्रामगृह येथे हा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून साहित्य लेखिका श्रीमती मायाताई दामोदर, पतंजली ग्रामोद्योग न्यास हरिद्वारचे महेश दिपके, महानगरपालिका गटनेता राजेश मिश्रा, दर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील पांडे, राष्ट्रीय सचिव संजय तिवारी, पोलीस टाईम 240 चे मुख्य संपादक राजेंद्र पाठक  , राजेश शुक्ला राष्ट्रीय उपाध्यक्ष दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अकोला जिल्हाध्यक्ष उषाताई वाकोळे, क्षेत्रीय मराठा फाउंडेशनचे अमित गुंजकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
      या मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, लोकमतचे हॅलो हेड प्रमुख सदानंद शिरसाट, क्राईम रिपोर्टर धनराज ससाने, झी 24 तासचे प्रतिनिधी मयूर निकम, बुलडाणा लाईव्हचे समूह सल्लागार कृष्णा सपकाळ, दै.महाभूमीचे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते पाटील यांचा 'दर्पण समाजसेवा' गौरव पुरस्काराने तसेच जिल्ह्यातील समाजसेविका सौ. ज्योती बावस्कर सौ. रंजना चव्हाण, सौ. जयश्री देशमुख, शिवाजीराव जाधव, सौ. शुद्धमती निखाडे यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाला शेगाव येथील देशोन्नती पत्रकार राजेश चौधरी, पत्रकार अनिल उंबरकर, बबलू देशमुख, सचिन बोहरपी, भुसारी  यांचेसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. 
____________________________________