* राष्ट्र संदेश गीत *

* राष्ट्र संदेश गीत *
 
सौजन्य दीप उजळा 
उजळोनी मानसाला
उजळा विचार आपुले
द्या धीर माणसाला - धृ. 

जीवन अमोल आहे
जगणे अमोल आहे 
विश्वात कुटुंबाला
बघणे अमोल आहे !! 
हृदयात सावली तर
जगण्यात अर्थ आला - सौजन्य -

भटकू नकोस मित्रा
उद्विग्न नको होऊ
हो मित्र भूतलाचा
तू विघ्न नको होऊ !! 
सत्कृत्य दान कर तू
बघ स्वार्थ फार झाला - सौजन्य -

सर्वांसी प्रेम द्यावे
क्रोधांसी संपवावे
आक्रोश दु:ख हिंसा
मनुजास ना दिसावे !! 
हातात हात घ्या, द्या
सोडून संगराला - सौजन्य -

तृष्णा अधर्म द्वेषं
जाळील उभा देशं
आतंक अन् सूडाने
होईल काय पेशं !! 
विध्वंस काय कामी
या सावरा धरेला - सौजन्य -

लावा सुरूंग तोडा
किल्ले गटागटांचे
हे वर्ण पंथ जाती
माहेर संकटांचे !! 
माणूस सर्व काही
कां कस्तुरे म्हणाला - सौजन्य -

रचनाकार- कवी -
डॉ. विजयकुमार कस्तुरे, 
ॲडव्होकेट, चिखली
राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष, 
केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली तथा
अध्यक्ष, बहुजन साहित्य संघ, चिखली, जि. बुलडाणा
भ्र. क्र. ९५५२०९४०४९,
८८५५०८५८७२
( गीताची चाल - इन्साफकी डगरपे, बच्चों दिखाओ चलके.....)