जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातील ज्ञानमंदिर * विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्कूलबॅगचे वाटप

जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातील ज्ञानमंदिर 
* विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्कूलबॅगचे वाटप 
लोणार : (एशिया मंच वृत्त)
      तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना एके काळी ग्रामीण भागातील ज्ञानमंदिर म्हणुन  पाहण्याचा ग्रामीण भागातील जनतेचा दृष्टी कोण असायचा परंतु खाजगी शाळांची वाढती स्पर्धा पाहता याकडे ग्रामीण भागातील मुले सुध्दा या  शाळाकडे वळू  लागली.  परिणामी या शाळेचे शिक्षण गरीब कुटुंबातील मुलांना परडवणारे नाही. एकीकडे सरकारी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी संख्या कमी झाल्याने  घर घर मोजत आहेत हीच परिस्थिती बदलण्यासाठी जलप्रवाह प्रमाणे  ज्ञानप्रवाह देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा वाचाव्या यासाठी ग्रामीण भागात लोक चळवळ निर्माण व्हावी या उद्देशाने लोणार तालुक्यातील मौजे आरडव येथील युवा तरुण शैलेश सरकटे या युवकाने आपल्या कल्पक बुद्धीतून सामाजिक भावनेतून सोशल मिडियाच्य माध्यमातुन लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करुन जमा झालेली लोकवर्गणी व स्वतः मिळकतीतून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत स्कूल बॅग वाटप करण्याचा शुभारंभ लोणार तालुक्यातील श्रद्धा स्थान असलेल्या संत  अश्रू बाबा महाराज यांच्या जन्म स्थळ असलेल्या संत नगरी जाफराबाद येथून  संत अश्रू बाबा महाराज यांचे आशिर्वाद घेऊन स्कूल बॅग वाटपाचा शुभारंभ माजी प.स.सदस्य दशरथदादा जायभाये यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आला.
      यावेळी  सुनील पाटील सुलताने, संचालक (कु.ऊ.बा.), भगवान पाटील सुलताने (तालुका प्रमुख शिवसेना), आबाराव हाडे (सरपंच), सरकटे सर (वेणी), परमेश्वर भाऊ ओव्हर, बबन महाराज ओव्हर, डॉ. पुष्पराज ओव्हर, दीपकभाऊ ओव्हर, शाळेचे मुखयाध्यापक साळुंखे, शैलेश सरकटे यांच्यासह मित्रमंडळ व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.