बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाचे विदर्भ स्तरीय कार्यकर्ता मेळावा २२ ॲागस्ट २०२३ रोज मंगळवार दुपारी १.०० वाजता बाळकृष्ण मंगल कार्यालय आर्णी रोड यवतमाळ येथे आयोजीत केला आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुधाकरराव तायडे हे राहणार आहे तर या मेळाव्याचे उद्घाटक भारत सरकारचे सामाजीक न्याय राज्यमंत्री तथा आखील भारतीय रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीयध्यक्ष रामदासजी आठवले हे करणार आहे तसेच विशेष उपस्थीती म्हणून माजी राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय सरचिटनिस अविनाशजी महातेकर, रिपाई राष्ट्रीय संघटक भुपेश थूलकर, रिपाईचे प्रदेशध्यक्ष तथा माजी मंत्री राजाभाऊ सरोदे, रिपाईचे प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, रिपाईचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, रिपाई प्रदेश कार्यध्यक्ष बाबूरावजी कदम, रिपाई प्रदेश सचिव सुमीत वजाळे हे राहणार आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक रिपाई विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, ॲड. विजय आगलावे तर स्वागताध्यक्ष यवतमाळचे रिपाई जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर हे राहणार आहे.
तरी या रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीयाच्या यवतमाळच्या विदर्भ मेळाव्याला बुलडाणा जिल्ह्यातील रिपाई पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महीला पदाधिकारी, ग्रामीण, शहरी,शाखा पदाधिकाऱ्यांनी व रामदासजी आठवले वर प्रेम करणाऱ्यांनी जास्तीत जास्त संखेने या कार्यक्रमास उपस्थीत राहावे असे आव्हान रिपाईचे बुलडाणा जिल्हा कार्यध्यक्ष तथा जेष्ठ नेते बाबासाहेब जाधव यांनी केले आहे.
