* 233 परिवारांना वाटले 5 लाख 50 हजार रुपये
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
मागील महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे महापूर आला होता, त्यामुळे जळगाव व बावनबीर येथील घरांमध्ये पाणी शिरले व सर्व सामानाची नासधूस झाली तर अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली.या पूरग्रस्तांच्या मादीतीसाठी सामाजिक संघटना जमिअत उल्मा ए हिंद (मौलाना अरशद मदनी) धावून आली. जळगाव जामोद व बावनबीर येथील 233 पीडित कुटुंबांना तब्बल 5 लाख 50 हजारांची रोख रक्कम वाटप करण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात पूरस्थितीची माहिती मिळताच जमिअत उल्मा ए हिंदच्या शिष्टमंडळाने बुलडाणा जिल्हाध्यक्ष हाफिज खलीलउल्ला शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी करून सर्वे केला व अहवाल प्रदेश कमेटीला मुंबईला सादर करण्यात आला होता. जमिअतच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी तत्काळ सल्लामसलत करून प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफिज मसूद अहमद हुस्सामी, प्रदेश सरचिटणीस मौलाना हलीमउल्ला कासमी आणि हाफिज मो. आरिफ हे बुलडाणा जिल्ह्यात पोहोचले व त्यांनी जिल्ह्यातील पधिकाऱ्यांशी चर्चा केली असता लक्षात आले की, आणलेली मदत अपुरी पडेल, म्हणून शिष्टमंडळ मुंबईला परत गेला व आर्थिक मदत वाढवून साडेपाच लाख रुपयांची रक्कम पाठवली.
जिल्हा सरचिटणीस मुफ्ती मो. अनिसुद्दीन अशरफी आणि जमिअतचे जिल्हाउपाध्यक्ष हाजी सय्यद अहमद, मौलाना अब्बास खान, मौलाना नेमतउल्ला खान हुसैनी,हाजी मो. वकार, हाजी बिस्मिल्ला, मो. नदीम कुरेशी,मो.आरिफ, हाजी अब्दुल जाबेर, मौलाना जावेद या शिष्टमंडळाने जळगाव जामोद व बावनबीर येथे जाऊन पूरग्रस्त 233 परिवारांना 5 लाख 50 हजारांची रोख आर्थिक मदत वाटप केली.
