बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करने प्रत्येकाची जबाबदारी* आयआरएस अधिकारी समिर वानखेडे यांचे प्रतिपादन

बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करने प्रत्येकाची जबाबदारी
* आयआरएस अधिकारी समिर वानखेडे यांचे प्रतिपादन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेचं आज देश एकसंघ आहे. संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचे स्वातंत्र बहाल केले. समता, न्याय व स्वातंत्र या त्रिसुत्रीच्या आधारावरचं देशाची वाटचाल सुरू आहे. तेंव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे रक्षण करने आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन विख्यात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर देशभरात प्रसिध्द झालेले आयआरएस अधिकारी समिर वानखेडे यांनी केले. ते स्थानिक गांधी भवन येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 22 एप्रील 2023 रोजी भाई विकास नांदवे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित भिमरत्न पुरस्कार वितरण व बुध्द-भिम गित गायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी भिमरत्न पुरस्कार प्राप्त सत्कारमुर्ति मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ता दुर्गा गुडीलू, अकोला येथील विख्यात विधीज्ञ अॅड आम्रपाली भावे, शिवनेरी टूडेचे संपादक विलास साळवे व नाशिकचे उदयोजक महेंद्र शिणगारे यांची उपस्थिती होती. यावेळी मुंबई येथील सिने पार्श्व गायिका रेश्मा सोनवणे यांनी एकापेक्ष एक सरस भिमगितांचे प्रस्तुतीकरण केले. कार्यक्रमाला हजारों बुलडाणेकरांनी उपस्थिती दर्शविली होती.
      भाई विकास नांदवे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला नवी उर्जा प्राप्त झाली आहे. नव्या पिढीला बाबासाहेबांचे विचार कळावे यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत समिर वानखेडे यांनी भाई विकास नांदवे यांचे तोंडभरून कौतुक केले.