हिरडव येथील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात

हिरडव येथील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात
लोणार : (एशिया मंच वृत्त)
         महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांसाठी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकरांना आळा घालण्याकरता बैठे पथक तैनात करण्यात आले आहे.
या पथकांकडून परीक्षा केंद्र आणि आवारात देखरेख करण्यात येतं आहे.
     पेपर फुटणे, कॉपी करणे असे अनेक गैरप्रकार परीक्षा काळात होत असतात. या गैरप्रकरांना आळा बसावा म्हणून गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक नियोजित करण्यात आले आहेत. लोणार तालुक्यातील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल हिरडव येथे इयत्ता 10 वी चे परीक्षा केन्द्र असुन या परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले आहे .
      या पथकात लोणार तहसीलचे नायब तहसीलदार आर. एम. डोळे , तलाठी सोनुने, तलाठी एम. बी. सरदार यांचा समावेश असुन परीक्षा केंद्र प्रमुख पी. पी. जायभाये, उपकेंद्र प्रमुख एस. टीी. सोनुने,   एस. आर. डोईफोडे आहेत. या एकूण १९४ विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती परीक्षा केंद्रप्रमुख  जायभायेे  यांनी दिली.