सकल मराठा समाजाच्या आक्रमकतेने बुलडाण्यातील कॅफे विरूध्द कारवाई* ठाणेदार काटकर यांनी तात्काळ केले पोलीस पथकांचे गठण* सर्व कॅफे चालकांना ठाण्यात बोलावले* गुलुगुलू करतांना आढळलेल्या मजनूनाही उचलले

सकल मराठा समाजाच्या आक्रमकतेने बुलडाण्यातील कॅफे विरूध्द कारवाई
*  ठाणेदार काटकर यांनी तात्काळ केले पोलीस पथकांचे गठण
* सर्व कॅफे चालकांना ठाण्यात बोलावले
* गुलुगुलू करतांना आढळलेल्या मजनूनाही उचलले
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराची ओळख सुसंस्कृत शहर अशी आहे. मात्र अलिकडच्या काळात शहरात कॅफेच्या नावाखाली मोठया प्रमाणात गैरप्रकार वाढले असल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची भेट घेवून, त्यांना निवेदन दिले. त्यानंतर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तात्काळ पथकांची नियुक्ती करून शहरातील सर्वचं कॅफेवर धाडी टाकल्या. कॅफे चालकांना ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली तर, कॅफेमध्ये अश्लील चाळे करणा-या काही मजनूनाही पोलीसांनी उचलले. ही घटना 1 मार्च 2023 च्या दुपारी घडली.
       बुलडाणा शहरातील अनेक कॅफेत पलंग, छोटे रूमल, दरवाजा कडी असून, त्याआड अनेक प्रेमीयुगुल नको त्या गोष्टी करीत असतात. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. यावर त्वरित आळा घालावा अशी मागणी सकल मराठा समाजाने केली असून, पोलीस त्या दृष्टीने कामाला लागले आहेत.