बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म व भारतीय तत्त्वज्ञानाची स्वकीयाकडू होणारी तोडफोड रोखण्याची असेल तर रामकथे सारख्या कथा आवश्यक असे आवाहन सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी स्वागतपर भाषणात केले.
समितीद्वारा आयोजित दिनांक 7 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरपण सुश्रीदेवी प्रियंकाजी द्वारा राम कथा लहाने ले आउट च्या मैदानावर प्रचंड गर्दी सुरू आहे. सकाळी नऊ वाजता श्रीराम मारुती मंदिर पासून शोभायात्रा सुरू होऊन कथास्थळी पोहोचल्यावर दुपारी 1 वा. कथेला सुरुवात झाली. मुख्य यजमान पप्पू शेठ अग्रवाल सहकुटुंब, नितीन जयस्वाल दैनिक यजमान, द्वारे स्वागत व आरती करण्यात आली. राधेश्याम चांडक आणि डॉक्टर सुकेश झंवर यांनी देवी प्रियंकाजी यांचे स्वागत केले व आरती केली. रामायण पाठ चे 13 यजमान सपत्नीक पुजन आणि आरती केली. बुलढाणा अर्बन वेद विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी पौर्वाहित्य केले.
यादरम्यान प्रसाद वाटप वर्मा परिवार यांच्यातर्फे करण्यात आले. कथा सुरू करताना सुश्री प्रियांकाजी यांनी सांगितले की, कथा लक्ष देऊन ऐकले तर जीवन आवश्यक बदलून जाईल, प्रयत्न प्रारब्ध व ईश कृपेनेच रामकथा ऐकायला मिळते. रामकथा चिंता मुक्त करते व चिंतनाकडे व्यक्तीला नेते . चली जा रही है उम्र धीरे धीरे हे भजन ऐकून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मंगला चरणी , सरस्वती व शिवस्तुती केली. हमारे साथ है रघुनाथ तो किस बात की चिंता या भजनाने मंडप दणाणून गेला. रामकथा प्रियंकाची चौधरी ऑफिशियल या चॅनेलवर सबस्क्राईब केले तर लाईव्ह दिसते. सत्संगामुळे तुळशीराम तुलसीदास झाले. रामचरित्र मानस हा ग्रंथ त्यांनी लिहून ठेवला.
शिवपार्वती चे झाकी व नृत्यांमुळे तर संपूर्ण मंडळ डोलायाला लागला. आंतरराष्ट्रीय स्थराचे झाकींवाले श्रोत्यांवर छाप पाडून गेले. रामाच्या भूमिकेत कुमारी ईशा ओमप्रकाश शर्मा, सितीच्या भूमिकेत कु.पायल सुशील जोशी, लक्ष्मणाच्या भुमिकेत कु. प्रियांका मुकुंद वैष्णव, हनुमानाच्या भूमिकेत चिरंजीव रौनक रश्मी अजय पंजाबी, राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत घुडस्वार कुमारी दिशा सुभाष घोरपडे ,व कुमारी स्वराली मिलिंद चिंचोलकर , हे सर्व नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले. ब्रह्मकुमारी केंद्र, गीता प्रेस गोरखपुर, औषधी व जडीबुटीचे विशाल स्टॉक लागले आहेत , याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे असे आवाहन समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुलढाणा अर्बन परिवार, श्रीराम मारुती मंदिर सर्व विश्वस्त चंपालाल शर्मा, विजय सावळे, शंकर शर्मा, लाला माधवानी, सुरेश गट्टानी, त्रिलोकचंद चांडक, महिला मंडळे, सिद्धार्थ शर्मा, उमेश मुंदडा, सचिन गुरुजी, प्रकाशचंद्र पाठक, ह भ प गंगाराम गव्हाळे, शरद काळे, राजपूत, या सर्वांनी परिश्रम घेतले.
